नांदेड : कंधारमध्ये 35 वर्षांनी मानले गुरुजनांचे ऋण; विद्यार्थ्यांचा अनोखा गेट टुगेदर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 24 February 2021

कंधार येथील जि. प. शाळेमधील सन 1986 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर गेट टुगेदर घेण्याचा निर्णय झाला.

नांदेड : जिल्हा परिषद हायस्कुल कंधार येथील सन 1986 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर साजरा करत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रतिनिधीक स्वरुपात तीन शिक्षकांचा यथोच्छीत सत्कार करत तब्बल 35 वर्षांनी गुरुजनांचे ऋण मानले.

कंधार येथील जि. प. शाळेमधील सन 1986 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर गेट टुगेदर घेण्याचा निर्णय झाला. या गेट टुगेदर कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्याचे ठरले. परंतु कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रतिनिधीक स्वरुपात तीन शिक्षकांचा सत्कार करुन ऋण व्यक्त करण्याचा निर्णय झाला.

अनिल कुर्‍हाडे यांच्या संकल्पनेतून स्नहेमिलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भिंगे तर प्रमुख पाहुणे श्री. नारलवार, श्री. राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांचा स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित गुरुजनांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुजनांनी तुम्ही शिकलात म्हणून आम्ही शिकवू शकलो. 

आज अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, अधिकारी झाले आहेत. हे विद्यार्थी समोर आल्यानंतर आजही आभार मानत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते कसे होते हे दिसून येते. परंतु आज परिस्थिती वेगळी झाली आहे. पुर्वी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारल्याची तक्रार पालकाकडे केल्यास पालकच विद्यार्थ्याला ‘दोन’देत होते. आज उलट झाले आहे. विद्यार्थ्याला मारले तर पालक तक्रार करुन गुन्हा दाखल करतात. अशी खंत व्यक्त केली. 

यावेळी माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार यांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून छोटासा गेट टुगेदर कार्यक्रम घेण्यात असून तीन शिक्षकांचाच सत्कार करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टळल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसह शिकवलेल्या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सामुहिक गेट टुगेदर घेण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक पांगरेकर तर आभार निशीज कुलकर्णी यांनी मांडले. 

यावेळी मनिष अंबुलगेकर, हेमंत कासार, राजकुमार कोटलवार, संजय ढोबळे, कृष्णा मामडे, बालाजी राऊत, विलास मुखेडकर, दत्तात्रय मामडे, महेंद्र कंधारकर, विजय पदमवार, राजेंद्र ठेवरे, डॉ. अशोक मुंडे, अनिल वट्टमवार, नरेंद्र महाराज, शशिकांत चालीकवार, परमानंद व्यास, दत्ता मुंडे, भास्कर कांबळे, बालाजी जवादवार, उमाकांत फरकंडे, राजकुमार मुखेडकर, निळकंठ मोरे, रमेश चाटे, विश्वनाथ मठपती, लक्ष्मण श्रीमंगले, डॉ. अविनाश गायकवाड, दिपक चालीकवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Gurujan's debt considered after 35 years in Kandahar; Students' unique get-together