Nanded Hadgaon Water supply scheme
Nanded Hadgaon Water supply schemeesakal

जवळगावकरांच्या ‘व्हिजन’ ला मूर्त स्वरुप

हदगाव शहरातील ५० कोटींच्या योजनेचे काम लवकरच : पाणीपुरवठ्याचे पुढील २५ वर्षांचे नियोजन

हदगाव : शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन जुनी व जीर्ण झाली असल्याने पाणी पुरवठ्याची व्यवस्था काही अंशी कोलमडली होती. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नव्हता. शहरवासीयांना शाश्वत, सुरळीत आणि अखंडीत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करुन हदगाव शहरासाठी तब्बल ४७ कोटी ३२ लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत मंजुर करुन आणली. या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हदगाव शहराची तहान भागविण्याच्या आमदार जवळगावकर यांच्या ‘व्हिजन’ला मूर्तस्वरुप मिळाले असेच मानावे लागेल.

हदगाव हे एक वाढते शहर म्हणून नावारुपास येत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २७ हजार ४३० एवढी आहे. शहराचा भौगोलिक विस्तारही झपाट्याने होत आहे. त्यात हदगावच्या जुन्या गावाच्या पाणीपुरवठ्याची पाईप लाईन १९७३ मधील तर नविन शहरामधील पाइपलाइन ही २००० मधील आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला अनुक्रमे २७ व २२ वर्षाचा झालेला कालावधी पाहता ती जीर्ण झाली होती. नेमकी हीच बाब लक्षात घेवून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत तब्बल ४७ कोटी ३२ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळविली. या नविन पाणी पुरवठा योजनेतून १३५ लिटर प्रतिहेड पाणी मिळणार असून हदगाव शहरालगत असलेल्या कोथळा बंधारा नदीपात्रातून जॅकविलने पाणी उपसा केला जाणार आहे.

नवीन योजनेचे असे असणार स्वरूप

  • ४७ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर.

  • निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात, लवकरच कार्यारंभ आदेश.

  • शहरात होणार ११५ किमी पाइपलाइन.

  • १३५ लिटर प्रतिहेड मिळणार पाणी.

  • नविन जलशुध्दीकरण प्रकल्प होणार.

  • पुढील २५ वर्षातील हदगावचा पाणी प्रश्न मिटणार.

  • १३२ गावांची तहान भागणार

हदगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत असतानाच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेंतर्गत हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील १३२ गावांना शुध्द व शाश्वत पाणी देण्यासाठी मंजुर करुन आणलेली ४६५ कोटी रुपयांची महत्वाकांक्षी ग्रीड पाणी पुरवठा योजना ही लवकरच मार्गी लागणार असून या योजनेच्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या असल्याने हा प्रकल्प येत्या काही दिवसात कार्यान्वित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com