Nanded हल्लाबोल मिरवणूक नांदेडमध्ये उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara

Nanded : हल्लाबोल मिरवणूक नांदेडमध्ये उत्साहात साजरी

नांदेड : बोले सो निहाल...सत् श्री अकाल... वाहे गुरूजी का खालसा, वाहे गुरूजी की फतेह...’असा जयघोष करत बुधवारी सायंकाळी शीख भाविकांनी मोठ्या उत्साहात दसऱ्यानिमित्त हल्लाबोल कार्यक्रम साजरा केला. यावेळी देश-विदेशातून मोठ्या संख्येने शीख भाविक उपस्थित होते.

मुख्य तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दसरा महोत्सवास ता. २६ सष्टेंबरपासून सुरवात झाली. त्याची सांगता बुधवारी पारंपरिक धार्मिक दसरा हल्लाबोल (दशहरा महल्ला) कार्यक्रमाने झाली. बुधवारी सकाळपासून गुरुद्वारात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती दुपारी गुरू साहिबचे पवित्र शस्त्र हे सिंहासन स्थानाच्या प्रमुख द्वारासमोर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी चार वाजता पूजा, आरती झाल्यानंतर दसरा हल्लाबोल मिरवणुकीला प्रारंभ झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता