
नांदेड : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत झेंडे मोफत वाटणार
नांदेड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘नांदेड के हर घर तिरंगा ’ हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यामध्ये दोन हजार २२ तिरंगे ध्वज मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, लायन्स बहुप्रांतीय अध्यक्ष दिलीप मोदी, लायन्स प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात घरोघरी जाऊन तिरंगे झेंडे वितरित होणार आहेत.
या अभियानासाठी प्रत्येकी शंभर झेंडे देणाऱ्या देणगीदारांमध्ये लायन्स झोन चेअरमन संजय अग्रवाल, ॲड. दिलीप ठाकूर, सिद्राम सुर्यभान दांडगे, भाजपा ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, प्रदेश कार्यकारीणी सदस्य संध्या राठोड, सचिन शिवलाड, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य जिल्हा सहप्रभारी डॉ. शीतल भालके, विजय कुलकर्णी बोराळकर, महिला मोर्चा किनवट अध्यक्षा सागर ज्ञानेश्वर शिंदे, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगरच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. एस. एस. जाधव धर्माबादकर, रमाकांत संभाप्पा भंडारे, उमा विजय कुलकर्णी, इसरीड टेक्नॉलॉजीचे सीईओ तौसीफ अहमद, भूषण वसंत सुवर्णकार यांचा समावेश आहे. सुषमा ठाकूर, संतराम गीते, सतनामकौर हुडा, वसंत अहिरे सोनईनगर, रवी जयस्वाल, विकास काबरा, कार्तिक मालीवार घनश्याम, डॉ. वीरेंद्र अवधिया यांनी प्रत्येकी ५० झेंडे दिले आहेत. ३३ तिरंगे झेंडे देणाऱ्यांमध्ये शिवा शिंदे, डॉ. अमोल हिंगमिरे, सदाशिव महाजन यांचा समावेश आहे.
Web Title: Nanded Har Ghar Tiranga Free Flags Distribution
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..