esakal | नांदेड - फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आरोग्य विभागाचे आवाहन, नांदेडला २७ पॉझिटिव्ह, ४२ जण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी (ता. ११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी एक हजार २९० स्वॅब प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २६१ निगेटिव्ह, २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १९ हजार ५६७ झाली आहे. गुरुवारी धामनगाव (ता.मुखेड) येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यू ५३५ झाले. 

नांदेड - फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आरोग्य विभागाचे आवाहन, नांदेडला २७ पॉझिटिव्ह, ४२ जण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सरासरी कमी झाली आहे. ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गुरुवारी (ता.१२) ४२ जणांनी कोरोनावर मात केली. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर २७ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. दरम्यान, कोरोना काळात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे. 
बुधवारी (ता. ११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी एक हजार २९० स्वॅब प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार २६१ निगेटिव्ह, २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १९ हजार ५६७ झाली आहे. गुरुवारी धामनगाव (ता.मुखेड) येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यू ५३५ झाले. 

हेही वाचा - विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण

१७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर 

गुरुवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयातील - आठ, जिल्हा रुग्णालयातील- पाच, एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील - १०, भोकर- सहा, बारड - एक, मुखेड - एक, कंधार - एक असे ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १८ हजार ५८९ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोना आजारातुन मुक्त होणाऱ्या बाधितांचे प्रमाण हे ९७.६६ टक्के इतकी आहे. सध्या २६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील १७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : दिवाळी निमित्ताने अन्न व औषध प्रशासन सजग, ७५ दुकानांची तपासणी, १५ दुकानांना नोटीसा 

२७ बाधित रुग्ण नव्याने आढळले

गुरुवारच्या आहवालात नांदेड महापालिका क्षेत्रातील - १७, नांदेड ग्रामीण - एक, देगलूर -एक, लोहा- एक, मुखेड- दोन, कंदार - एक, हदगाव - दोन, लातूर - एक व अकोला एक असे २७ बाधित रुग्ण नव्याने आढळुन आले. 

नांदेड जिल्हा 

एकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ५६७ 
आजचे पॉझिटिव्ह - २७ 
आजचे मृत्यू -एक 
उपचार सुरु - २६६ 
एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ५८९ 
एकूण मृत्यू - ५३५