नांदेड - गृह विलगीकरण कक्षात सर्वाधिक १५९ कोरोनाबाधित रुग्ण 

file Photo
file Photo

नांदेड - जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयासह महापालिकेने तयार केलेल्या कोरोना सेंटर उपलब्ध आहेत. असे असताना तालुक्यांतर्गत सुरु असलेल्या गृह विलगिकरणात ४६ तर महापालिकेंतर्गत गृह विलगीकरण कक्षात सर्वाधिक १५९ कोरोनाबाधित रुग्ण ठेवण्यात आले आहेत. 

रविवारी (ता. तीन) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता. चार) ६२४ अहवाल प्राप्त झाले. त्यामधील ५८५ निगेटिव्ह, ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ५९८ इतकी झाली आहे. सोमवारी देखील दिवसभरात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आरोग्य विभागास दिलासा मिळाला आहे. जिल्‍ह्यातील मृत्यूचा आकडा ५७५ वर स्थिर आहे. 

कोरोमुक्त रुग्णांची संख्या २० हजार ४९४ 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - तीन, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण कक्षातील - ११, भोकर - एक, कंधार - एक, देगलूर दोन, किनवट - एक, माहूर - चार आणि खासगी रुग्णालयातील - पाच असे २८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २० हजार ४९४ इतकी झाली आहे. 

१२ रुग्णांची प्रकृती अती गंभीर 

नांदेड महापालिकेंतर्गत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सोमवारी मनपा क्षेत्रात १९, नांदेड ग्रामीण- एक, अर्धापूर - दोन, माहूर - दोन, किनवट - एक, देगलूर - दोन, कंधार - एक आणि मुखेड - चार असे ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१ हजार ५९८ इतकी झाली. त्यापैकी २० हजार ४९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ५७५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील १२ रुग्णांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर ः 

सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३२ 
सोमवारी कोरोना मुक्त - २८ 
सोमवारी मृत्यू - शुन्य 
एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या - २१ हजार ५९८ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २० हजार ४९४ 
एकूण मृत्यू - ५७५ 
उपचार सुरु- ३२८ 
गंभीर रुग्ण - १२ 
स्वॅब तपासणी सुरु - ३९५ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com