esakal | नांदेडला पुन्हा धक्का : बुधवारी ५६ बाधित, तर चार जणांचा मृत्यू, १९ ची मात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आजच्या एकूण २४९ अहवालापैकी १९० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार    ७४ एवढी झाली आहे. यातील ७४ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४४३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३६ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १३ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे.

नांदेडला पुन्हा धक्का : बुधवारी ५६ बाधित, तर चार जणांचा मृत्यू, १९ ची मात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. २२) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज ५६ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज १९ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शहराच्या हडको, माळाकोळी, अंबुगला आणि लोहा येथील एका ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सदर बाधितास शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ५५ एवढी झाली आहे. यात ४८ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण २४९ अहवालापैकी १९० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार ७४ एवढी झाली आहे. यातील ७४ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ४४३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३६ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १३ महिला व २३ पुरुषांचा समावेश आहे.

आज बरे झालेल्या १९ बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील चार, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील सहा, देगलूर एक, पंजाब कोविड केअर सेंटर येथील तीन, हदगाव एक, मुदखेड पाच, जिल्हा रुग्णालय दोन, खासगी रुग्णालयातील दोन, औरंगाबाद संदर्भीत झालेले तीन बाधितांचा यात समावेश आहे.

हेही वाचा मरखेल ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील राजनगर पावडेवाडी एक, पाठकगल्ली एक, दत्तनगर एक, भावसार चौक एक, दिलीपसिंग काॅलनी एक, देगलूर नाका एक, गौत्तमनगर एक, आनंदनगर तीन, रजा काॅलनी एक, विष्णुपूरी एक, हडको एक, उमरी ता. अर्धापूर एक, मंजुळानगर भोकर एक, घोटा ता. हिमायतनगर एक, माळाकोळी ता. लोहा एक, मारोती मंदीर जवळ कंधार एक, विजयगड कंधार चार, मोची गल्ली ता. देगलूर एक, मोंढा देगलूर एक, उपजिल्हा रुग्णालय देगलूर एक, लाईनगल्ली देगलूर चार, भुत्तनहिप्परगा ता. देगलूर एक, देगलूर शहर एक, शांतीनगर देगलूर एक, अंबुलगा ता. मुखेड एक,      नागपीठ गल्ली मुखेड एक, पाखदेवाडी ता. मुखेड चार, मुक्रमाबाद ता. मुखेड दोन, अहिल्याबाई होळकरनगर ता. मुखेड एक, मेन मार्केट मुखेड तीन,मेन रोड मुखेड एक, कोलंबी ता. नायगाव तीन, फुले काॅलनी नायगाव एक, पारवा नायगाव एक, नायगाव शहर एक, नरसी ता. नायगाव एक, शेलगा ता. हिंगोली एक, वसमत एक, मोतीनगर पुसद जिल्हा यवतमाळ एक 

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४४३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १४४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १९, जिल्हा रुग्णालय येथे ३१, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ४९, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ३३, माहूर कोविड केअर सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे १२, कंधार कोविड केअर सेंटर येथे ७, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, भोकर एक, खाजगी रुग्णालयात ३८ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित तीन निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करा -  मोबाईल चोरट्यांकडून ३१ मोबाईलसह सव्वातीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ३५६
घेतलेले स्वॅब- १० हजार ९३६,
निगेटिव्ह स्वॅब- ८ हजार ७८६,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या-५६
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १०७४,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ३,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-०,
मृत्यू संख्या- ५५,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ५७४,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ४४३,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३२८.  

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे


--