Nanded: ‘आयसीडीएस’चा पूरक पोषणही किडलेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : ‘आयसीडीएस’चा पूरक पोषणही किडलेला

नांदेड : ‘आयसीडीएस’चा पूरक पोषणही किडलेला

माहूर : महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत तालुक्यातील गरोदर माता व सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार म्हणून वाटप केले जाणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे पुरवठा करून गरोदर मातांच्या जीवाशी खेळण्याचा जीवघेणा प्रकार माहूर तालुक्यात आढळून आला आहे. गरीब कुटुंबातील गरोदर माता व बालक यांना अशा स्वरूपाचे सडके धान्य पुरवठा केला जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन प्रसंगी बालकांच्या कुपोषण आजाराला हे आहार जबाबदार असल्याचा आरोप लाभार्थीं महिलांमधून केला जात आहे.

बाळ गर्भात असताना गरोदर आणि स्तनदा मातांना निकृष्ट दर्जाचा पूरक आहार खाद्यान्न म्हणून दिला जात असल्यानेच बालकांमधील कूपोषण वाढत असल्याचा गंभीर आरोप गरोदर माता करत आहेत. याबाबत प्रभारी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी आरबडवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सदर धान्याचा पुरवठा कंत्राटदारामार्फत बालविकास विभागाला जिल्हास्तरावरून केला जातो. त्यामुळे कारवाई करण्याचे अधिकार आमच्या कार्यालयाला नाहीत, मात्र आयसीडीएस मार्फत वाटप केल्या जाणाऱ्या निकृष्ट पूरक आहाराच्या संदर्भाने निरीक्षण नोंदवून अहवाल सादर करणार आहे.

- युवराज मेहेत्रे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माहूर

loading image
go to top