esakal | नांदेड - ​ बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येणाची शक्यता 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

एक वर्षापूर्वी विष्णुपुरी शासकीय रुग्णालय प्रशासनामार्फत मोडुलर प्लॉन दिला आहे. त्याकडे आरोग्य मंत्र्यांनी देखील विशेष लक्ष दिल्याने लवकरच या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालीटी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड - ​ बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येणाची शक्यता 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - औरंगाबाद वगळता नांदेडचे विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे अद्यावत आरोग्य सेवा सुविधा असलेले मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयात लवकरच मल्टी सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल सुविधा सुरु होणार आहे. येथे बायपास सर्जरी विभाग सुरु होणार असून यासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 

एक वर्षापूर्वी विष्णुपुरी शासकीय रुग्णालय प्रशासनामार्फत मोडुलर प्लॉन दिला आहे. त्याकडे आरोग्य मंत्र्यांनी देखील विशेष लक्ष दिल्याने लवकरच या नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालीटी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात मल्टी सुपर स्पेशालिटीनुसार १३ मॉडुलर सर्जरी विभाग (ओटी) बांधुन तयार आहेत. 

हेही वाचा - विशेष रेल्वे बंद करण्याचा घातला घाट, प्रवासी संख्या रोडावल्याचे कारण

राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय असेल 

मात्र, त्यापैकी सहा ते सात सर्जरी विभाग सुरु आहेत. इतर सर्जरी विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ह्रदयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्यूरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग सुरु झाल्यास ते राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय असेल असा दावा केला जात आहे. हा विभाग सुरु झाल्यास नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, लातूर, बीड, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्याच्या सिमा भागास लागुन असलेल्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील रुग्णांना देखील दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : दिवाळी निमित्ताने अन्न व औषध प्रशासन सजग, ७५ दुकानांची तपासणी, १५ दुकानांना नोटीसा 

गरजवंतांना चांगला फायदा होणार 

अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असल्याने त्यांच्या काळात अत्याधुनिक अशी कार्डियाक युनिट, कार्डियालॉजिस्ट कॅथलॅब सुरु करण्यासाठी अधिक प्रयत्नशिल आहेत. एखाद्या रुग्णास खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करायची झाल्यास त्यासाठी किमान दिड- दोन लाखाच्या पुढे खर्च येतो. त्यामुळे अनेक रुग्णांच्या खिशाला हा खर्च परवडणारा नसतो. मात्र, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हा विभाग झाल्यास त्याचा गरजवंतांना चांगला फायदा होणार आहे. 

कॅथलॅब सुरु करण्याचा प्रयत्न आहे
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आरोग्य सुविधा आहेत. परंतू, ह्रदयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्यूरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग तेवढा नाही. म्हणून कॅथलॅब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आरोग्य मंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच हा विभाग प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 
- डॉ.सुधीर देशमुख, अधिष्ठाता.