Nanded : इंडिया मेगा कंपनीने थकविले १५० कोटी रुपये ; संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Nanded protested
Nanded protested Sakal
Updated on

नांदेड - घोटाळ्यात सापडलेल्या कृष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीने दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये थकवले आहेत.

ही रक्क देण्यात यावी, यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्याल्यावर रॅली काढली होती. दरम्यान शेतकऱ्यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

Nanded protested
Pune Metro : पुणेकरांचा मेट्रोला उदंड प्रतिसाद! आता वनाज ते रुबी हॉल फेऱ्यांसाठी एक तास वाढवला

कृष्णूर (ता.नायगाव) येथील इंडिया मेगा अॅग्रो कंपनीने ८०० शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेतला होता. हरभरा, सोयाबीन, मटकी, हळद आदी माल २०२१ मध्ये खरेदी केला. मात्र, मुदत संपून दोन वर्षे झआली, तरीही शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपये मिळालेले नाहीत.

त्यामुळे तीन जून २०२१ रोजी कंपनीच्या गेट समोर आंदोलन केले. त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अर्ध नग्न आंदोलनही केले होते. परंतु, कंपनीने पेसेच दिले नाहीत.

Nanded protested
Mumbai News : प्रवाशांची तक्रार ऐकण्यासाठी RPF जवान गेला पण तोल गेला अन् जीव गमावला

ही थकीत रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी (ता.१४) शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यानुसार सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकऱ्यांनी रॅली सुरु केली.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर पोलिसांनी सदर रॅली अडवली. शेतकऱ्यांनी येथेच रस्त्यावर बसून कंपनी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा सुरु केल्या. यानंतर काही कळायच्या आत शेतकऱ्यांनी सामुहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

रॅलीमध्ये रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, उत्तम वडजे, नितीन आबादार, व्यंकट कदम, संभाजी पाटील, शरद पाटील, अमोल डोणगावकर यांच्यासह कृष्णूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com