Nanded नांदेडकरांनो सावधान....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Intense heat next five day

नांदेडकरांनो सावधान....!

नांदेड : मार्च महिन्याासून सामान्यपणे उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवतो आहे. त्यातच उन्हाचा चटका सामान्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरू लागला आहे. त्यात आता हवामान खात्याकडून येत्या पाच दिवसात राज्यात विशेषतः मराठवाड्यात उष्ण लहरींचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे एरवीच तापलेल्या नांदेडला पुढील पाच दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून सातत्याने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यातून तापमानात वाढ नोंदविली जात आहे. बंगालच्या उपसागरातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यातून उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट नोंदविली जात होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

पहाटे आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने कष्टकरी, शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी कष्टकरी व शेतकरी सकाळी ११ वाजेपर्यंतच काम करत असून, सायंकाळी चार वाजेनंतर सहा वाजेपर्यंत कष्ट करत आहेत. अतिउष्णतेमुळे पाण्याचे स्त्रोतही आटत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचाही प्रश्न बिकट होत असून, शासनाने चारा छावण्या सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे.

सातत्याने तापमानात वाढ

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यात एप्रिल अखेरीस नांदेडचे तापमान सातत्याने वाढत आहे. गुरुवारी ४३ अंशावर असलेले तापमान शनिवारी ४३.७ अंशावर पोहोचले होते. येत्या काही दिवसात ते ४४ अंशावर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एसी, कुलरचा वापर करत असून खरेदी-विक्रीही वाढली आहे.

आठ दिवसातील तापमान

तारीख कमाल किमान

२३ एप्रिल ४१ २७

२४ एप्रिल ४१.६ २७.४

२५ एप्रिल ४१.८ २७.४

२६ एप्रिल ४२ २७

२७ एप्रिल ४२.२ २७.८

२८ एप्रिल ४३ २८

२९ एप्रिल ४३.२ २७.८

३० एप्रिल ४३.७ २६

Web Title: Nanded Intense Heat Next Five Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top