नांदेड : पुन्हा लोहा शहर लाॅकडाउन, रुग्ण संख्या वाढण्याचे कारण

बापू गायखर
Saturday, 5 September 2020

कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी लोहा पालिकेने पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवला. यानंतर लोहा शहर व मोठी लोकसंख्या असलेल्या गावात गर्दी होऊ नये यासाठी कठोर निर्णय अमलात आणण्यात येणार आहेत .

लोहा (जिल्हा नांदेड) : लोहा शहर व ग्रामीण भागात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून दिवसे दिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे कोरोनाची साखळी  तोडण्यासाठी लोहा पालिकेने पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवला. यानंतर लोहा शहर व मोठी लोकसंख्या असलेल्या गावात गर्दी होऊ नये यासाठी कठोर निर्णय अमलात आणण्यात येणार आहेत पोलीस प्रशासन मालिका आणि वैद्यकीय प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोवीड सारख्या महामारीच्या काळात नागरिकांची आरोग्य चांगले रहावे तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग थांबावा त्यासाठी नगर परिषद व  व्यापारी यांनी लोहयातील बाजार पेठ बंद करण्याचा निर्णय घेतला परंतु नको त्या ठिकाणी नागरिक  आरोग्याची काळजी घेत नसल्याचे उघडकीस आल्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.  

हेही वाचा - Video- शिक्षक दिन विशेष : निवृत्त शिक्षकाचा असाही छंद

लोहयातील बाजार पेठ बंद

लोहा शहरातीतील व ग्रामीण भागातील असे सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. लोहा शहरातच १३८ जनाना कोरोणा चा संसर्ग झाला आहे तर ग्रामीण भागात  ८४ जणांना कोरोणाची बाधा झाली आहे.

दुकानदारांनी लोहा नगर परिषदेला सहकार्य करावे

मागील आठवड्यापासून शहरात दररोज दहा ते पंधरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे . नागरिक, व्यापारी आणि  दुकानदारांनी लोहा नगर परिषदेला सहकार्य करावे असे आव्हान नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार ,मुख्य अधिकारी अशोक मोकले यांनी  केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Iron City lockdown again, due to increase in number of patients nanded news