Nanded : जलधारा आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : जलधारा आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना विषबाधा

मांडवी : जलधारा (ता. किनवट, जि. नांदेड) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ५१६ पैकी सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२०) विषबाधा झाली. त्यांना जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील ११ विद्यार्थ्यांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात, तेथून चौघांना नांदेड जिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे यांनी दिली.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. त्यातील वांग्याच्या भाजीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. भाजी खाल्ल्यावर काहींना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आमदार भीमराव केराम यांना रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विषबाधा

झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चांदणी मेंडके, जयश्री डुडुळे, काजल तांबारे, सविता पिंपळे, दिव्या ढोले, पूजा ढोले, वैष्णवी मिराशे, वंदना डुकरे, श्रद्धा शेळके, ओमसाई ढोले, दिव्या मेंडके यांचा समावेश असल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली.

Web Title: Nanded Jaladhara Ashram School Poisoned 40 Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..