नांदेड- जम्मू तावी- नांदेड विशेष एक्सप्रेस 29 जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

file photo
file photo

नांदेड :  नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून ता. २९ जानेवारीपासून नांदेड- जम्मू तावी- नांदेड विशेष एक्सप्रेस चालविण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाने हिरवी झेंडी दाखविली आहे. या गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ही गाडी पूर्ण आरक्षीत असणार आहे. असे रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे. 

गाडी संख्या 02751 / 02752 नांदेड- जम्मू तावी- नांदेड विशेष एक्सप्रेस सुरु करण्याचे रेल्वे बोर्डाने मान्य केले आहे. ही गाडी ता. 29 जानेवरीपासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असेल. 

गाडी संख्या 02751 हजूर साहिब नांदेड- जम्मू तावी विशेष एक्सप्रेस ( साप्ताहिक ) :  

गाडी संख्या 02751 हजूर साहिब नांदेड- जम्मू तावी विशेष एक्सप्रेस ता. 29 जानेवारीपासून दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी सकाळी 11. 05 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, न्यू दिल्ली, जालंधर मार्गे जम्मू तावी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 23. 05  ला पोहोचेल. 

गाडी संख्या 02752 जम्मू तावी- हजूर साहिब नांदेड विशेष एक्सप्रेस ( साप्ताहिक ) : 

गाडी संख्या 02752 जम्मू तावी- हजूर साहिब नांदेड विशेष एक्सप्रेस ता. 31 जानेवारीपासून दर रविवारी धावणार आहे. ही गाडी जम्मू तावी येथून दर रविवारी सकाळी 05. 45 वाजता सुटेल आणि जालंधर, अंबाला, न्यू दिल्ली, अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15. 50 वाजता पोहोचेल. ही गाडी पूर्ण आरक्षित असेल, या गाडीत १९ डब्बे असून सर्व डब्बे वातानुकुलीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com