नांदेडच्या जवानाला जोधपूरमध्ये प्रशिक्षणा दरम्यान वीरमरण

जवान संतोष पाटील सिदापुरे
जवान संतोष पाटील सिदापुरे Jawan Santosh Patil Sidapure/Nanded

लोहा (जि.नांदेड)  : जोधपूर (Jodhapur) येथे आगामी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चित्तथरारक प्रशिक्षणाचा सराव करत असताना सोनखेडचे सुपुत्र संतोष गंगाधरराव पाटील सिदापुरे (वय 30) यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सोनखेड येथे शासकीय इतमामात आणले जात आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या मुख्य रस्त्यावर पथसंचलन करण्याची तयारी चालवली होती. जोधपूर येथे चित्तथरारक पथसंचलनाची प्रशिक्षण पूर्वतयारी  करत असताना झालेल्या अपघाती घटनेत संतोष पाटील सिद्धापुरे यांना वीरमरण आले. जोधपूर येथून खास विमानाने त्यांचे पार्थिव पुणे येथे आणले जाईल. यानंतर बीएसएफ बटालियनच्या (BSF) वतीने संतोष पाटील यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात येईल. त्यानंतर पुणे येथून नांदेडला आणले जाईल. चाकूर येथील बीएसएफच्या मुख्य बटालियनच्या पथकासोबत शाही इंतमामात नांदेड विमानतळ (Nanded Airport) ते सोनखेड अशी रॅली काढण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांनी दिली.

जवान संतोष पाटील सिदापुरे
रस्त्याची बोंब! रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेने दिला बाळाला जन्म

शहीद संतोष पाटील यांचे प्राथमिक शिक्षण सोनखेड येथील जिल्हा परिषद विद्यालयात झाले. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालयात झाले अत्यंत शांत, गुणी असलेले शहीद संतोष पाटील हे सुट्टीवर आल्यानंतर येथील सर्व तरुणांना देश सेवेसाठी मार्गदर्शन करत शिवाय वेगवेगळ्या कसरती करण्याचे प्रशिक्षण देत असत. बीड सांगी येथील विष्णुकांता हिच्याशी त्यांचा वर्ष 2008 मध्ये विवाह झाला होता. शहीद संतोष पाटील हे 2009 नऊ मध्ये देशसेवेच्या कार्याला बीएसएफमध्ये वाहून घेतले. तब्बल बारा वर्ष त्यांनी सेवा केली प्रारंभी जम्मू-काश्मीर आसाम आणि राजस्थान मध्ये सेवेत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

जवान संतोष पाटील सिदापुरे
सर्व अधिकार RBI कडे गेल्यास संचालकांनी काय करायचं - शरद पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com