नांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर

प्रल्हाद कांबळे
Saturday, 17 October 2020

दरम्यान जानेवारी २०२० ते आॅक्टोबरपर्यंत या दहा महिण्यात पोलिस खात्यासह अन्य विभागातील लाचखोर कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. यात पोलिस खाते अव्वल असून महसूल विभाग दुसऱ्या स्थानी आहे. यात शिक्षण विभागाही मागे नाही. 

नांदेड : सरकारी काम आणि सहा महिणा थांब या म्हणीनुसार शासकिय बाबु आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र काही जण आमिषापायी बळी पडतात. लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु पैशाच्या हव्यासापोटी लाच स्विकारण्याच्या प्रमाणात वाढत होत आहे. दरम्यान जानेवारी २०२० ते आॅक्टोबरपर्यंत या दहा महिण्यात पोलिस खात्यासह अन्य विभागातील लाचखोर कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले. यात पोलिस खाते अव्वल असून महसूल विभाग दुसऱ्या स्थानी आहे. यात शिक्षण विभागाही मागे नाही. 

गरजु व सर्वसामान्यांचे कोणतेही शासकिय काम करून देण्यासाठी शासकिय बाबू लाचेची मागणी करतात. सध्या लॉकडाऊनच्या काळातही लाचखोर कर्मचाऱ्यांना मोह कमी झाला नाही. अगोदरच हाताला काम नसलेल्या तक्रादाराकडून लाच घेणे काही कमी झाले नाही. मात्र या लाचखोरांनाही जाग्यावर आणणारे अनेक महाभाग आहेत. इच्छा नसणारे शाकिय बाबूना लाचेच्या जाळ्यात अडकवितात. अनेक जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडतात.

हेही वाचा -  मेहुणीच्या अल्पवयीन मुलीचे शोषण, काका, मामाला १० वर्षे सक्तमजुरी -
 २४ कारवाईत ३२ लाचखोर जाळ्यात 

यावर्षी जानेवारी २०२० ते ता. १५ आॅक्टोबरपर्यंत या दहा महिण्यात २४ सापळे लावण्यात आले. यामध्ये पोलिस खात्यातील नऊ कर्मचारी अडकले आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर महसूल विभागात लावलेल्या सापळ्यात अधिकारी, कर्मचारी अडकले असून यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदींचा समावेश आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वित्त विभागाचे अधिकारी व सेवक एकाच सापळ्यात सापडले आहेत. त्या पाठोपाठ आलेल्या आरोपींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. नगररचना विभागातील दोन कर्मचारी एकाच सापळ्यात अटक झाले आहेत तर वस्तू व सेवा कर कार्यालय नागपूर विभागाचे अधिकारी, शिक्षण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत आले आहेत. शिक्षण विभागही यात मागे नाही. यामध्ये दोन मुख्याध्यापकांचा व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर विभागात एसीबीने दोन सापळे लावून दोघांना ताब्यात घेतले. एकंदरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते आज पावेतो २४ सापळे लावले असून ३२ लाचखोरांना ताब्यात घेतले आहे. 

येथे क्लिक करानांदेड महापालिकेतर्फे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

लाचखोरांची तक्रार देणाऱ्यांचे नाव गोपनीय

शासकीय अधिकारी, कर्मचारी शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार याबाबत काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी भ्रष्टाचार केला असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Khaki has been tainted by bribery, while revenue is second only to sand nanded news