नांदेड : खुरगांवचा विकास होणे आवश्यक- भन्ते पंय्याबोधी

प्रल्हाद कांबळे
Sunday, 22 November 2020

आता कुठं शासनाच्या विविध योजना मुळे गावात रस्ते, पाणी अन घरकुल योजनेतून गरिबांना मिळालेली हक्काची घरं. बाकी शेती कोरडवाहू असल्यानं सगळ्यांचा कल शहरांकडे. काहीजण दुग्ध व्यवसाय करतात तर काही विविध वाहने चालवून घरगाडा ओढतात. या गावचा विकास होणे आवश्यक असल्याचे मत भन्ते पंय्याबोधी यांनी व्यक्त केले. 

नांदेड : खुरगाव हे गाव नांदेड शहरापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर. पण विकासाच्या बाबतीत थोडे दुर्लक्षितच. खुप वर्षापूर्वी आसना नदीला महापूर आल्यामुळे या गावाचं पुनर्वसन होऊन माळरानावर हे गावं वसलं. जेम- तेम हजार अकराशे वस्तीच गावं. आता कुठं शासनाच्या विविध योजना मुळे गावात रस्ते, पाणी अन घरकुल योजनेतून गरिबांना मिळालेली हक्काची घरं. बाकी शेती कोरडवाहू असल्यानं सगळ्यांचा कल शहरांकडे. काहीजण दुग्ध व्यवसाय करतात तर काही विविध वाहने चालवून घरगाडा ओढतात. या गावचा विकास होणे आवश्यक असल्याचे मत भन्ते पंय्याबोधी यांनी व्यक्त केले. 

काही घरची मंडळी आहे ती शेती कसतात. शिकलेली चार- दोन मुलं कुठ कंपनीत तर काही सरकारी नोकरीत अन काहींचा स्वतंत्र व्यवसाय. वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं आपापल्या परीने धर्मासाठी काम करत आहेत. तसं हे खुरगाव नैसर्गिकरित्या समृद्ध गाव आहे.
खूप उंचावर वस्ती असलेल्या गावात एकदा भन्ते पंय्याबोधी आले असताना त्यांनी गावातील बौद्ध वस्तीत जावून अचूक नजरेनं तिथला परिसर न्याहाळला.काही दिवसांनी गावालगत असलेली जमीन खरेदी करुन तिथं पाण्याची व्यवस्था करुन भिखुंना राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली. आणि त्यांच्या समवेत स्वतः भन्ते पंय्याबोधी वास्तव्यास राहून तळमळीने गावातील मंडळींच्या सहकार्याने निर्माण केलेल्या कामाला गती देऊ लागले.

निसर्गरम्य वातावरणात तथागताच्या शिकवणीचे धडे

साधारणतः एक वर्षाच्या काळात अथक परिश्रमातून आज तिथं मोठ्ठी वास्तू उदयास येत आहे. भिखु गणास राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, श्रामनेर शिबिरासाठी मोठ्ठा हॉल आणि निसर्गरम्य वातावरणात तथागताच्या शिकवणीचे धडे देण्यासाठी भन्ते पंय्याबोधीसोबत जवळपास पंधरा भन्ते कायम वास्तव्यास आहेत. दहा दिवस ते एक महिन्याच्या कालावधीचे शिबीर असते. शिबिराचा लाभ अनेक जण घेत आहेत. श्रामनेर शिबिरासाठी आलेल्या शिबिरार्थीला राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था भन्ते पंय्याबोधी मिळालेल्या दानातून करत असतात. आज लावलेले हे छोटे रोपटे भविष्यात निश्चितच वटवृक्षासारखे विशाल होईल असे भन्ते पंय्याबोधी यांनी विश्वास व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Khurgaon needs to be developed- Bhante Panyabodhi nanded news