नांदेड : सोनखेड खूनप्रकरणातील मारेकरी मोकाट

प्रल्हाद कांबळे
Sunday, 8 November 2020

लोहा तालुक्यातील पेनुर येथे एक जुलै रोजी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने गावातील काहींनी एडके परिवारातील कुटुंबप्रमुखाचा खून केला. सदर घटनेनंतर पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल करुन घेतला गेला नसल्यामुळे याप्रकरणी मयताच्या मुलाने न्यायालयात धाव घेतली.

नांदेड : साडेचार महिन्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर चक्क पंधरा दिवसानंतरही मारेकरी मोकाट असल्याने त्यांना तात्काळ अटक करा अशीमागणी पिडीत कुटुंबियांनी केली आहे. सोनखेड पोलिस मारेकऱ्यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

लोहा तालुक्यातील पेनुर येथे एक जुलै रोजी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने गावातील काहींनी एडके परिवारातील कुटुंबप्रमुखाचा खून केला. सदर घटनेनंतर पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल करुन घेतला गेला नसल्यामुळे याप्रकरणी मयताच्या मुलाने न्यायालयात धाव घेतली. अखेर लोहा न्यायालयाच्या आदेशाने सोनखेड पोलिस ठाण्यात तब्बल चार महिने २० दिवसांनी पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र पंधरा दिवस उलटून गेले तरीही मारेकरी मोकाट असल्याने पिडिताच्या जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा -  ऊसतोड मजुरांवर काळाचा घाला ; दोन ठार

जमीन हडप करण्याच्या उद्देशाने खून

पेनूर (ता. लोहा) येथील शिवारात श्री. धोंडे यांच्या शेतात ता. एक जुलै रोजी सकाळी शामराव राघोजी एडके (वय ६२) राहणार पेनुर यांचा मृतदेह आढळून आला होता. सदर प्रकार हा अपघाताचा नाहीतर जमीन हडप करण्याच्या उद्देशाने गावातील पाच तरुणांनी व भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील दोघांच्या सांगण्यावरुन केला असल्याची तक्रार सोनखेड पोलिसात दिली होती. मात्र सोनखेड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन न घेता केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

येथे क्लिक करानांदेड : महामार्ग पोलिस भलत्याच कामात व्यस्त, रस्त्यावरील खड्ड्यांच्या लागले मागे -

मारेकरी मोकाट, पोलिसांची भुमिका संशयास्पद

याप्रकरणी मयताचा मुलगा संतोष एडके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करुन घेण्याची मागणी केली होती. परंतु पोलिसांकडून मारेकऱ्यांविरुद्ध कसलीच कार्यवाही होत नसल्याने मयताचा मुलगा संतोष एडके यांनी अखेर लोहा न्यायालयात धाव घेतली होती. शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. लोहा न्यायालयाचे न्यायाधीश तौर यांनी सोनखेड पोलिसांना सदर मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरुन सोनखेड पोलिसांनी चार महिने २० दिवसांनी दिलीप बळीराम वाघमारे, प्रकाश बळीराम वाघमारे, बालाजी मल्‍हारी एडके, साई बालाजी एडके, रमेश मल्हारी एडके सर्व राहणार पेनूर (तालुका लोहा) व बाहूबली बाबासो मालेगावे आणि भारत बाबासो मालेगावे राहणार भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्याविरुद्ध खूनासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सोळा दिवस उलटून गेल्यानंतरही वरील आरोपी मोकाट असल्याने सोनखेड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Killer not arrested in Sonkhed murder case nanded news