नांदेड : सिद्धार्थ जोंधळेच्या मारेकऱ्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 14 October 2020

शहराच्या कल्याणनगर येथील रहिवासी असलेला सिध्दार्थ दौलत जोंधळे याच्यावर टिळकनगर, सांगवी येथील रहिवासी असलेला रवी हडसे याने त्याचे साथीदार अजय उर्फ बंटी लोणे व अतिष सुरेश चव्हाण यांच्या मदतीने तू आमच्याकडे रागाने का बघतोस असे म्हणून चाकुहल्ला करुन गंभीर जखमी केले. त्या नंंतर त्याचा मृत्यू झाला होता.

नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राज कॉर्नर येथे एका तरुणावर चाकुहल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना ता. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायाधीश एम. आर. यादव यांनी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एक आरोपी फरार आहे.

शहराच्या कल्याणनगर येथील रहिवासी असलेला सिध्दार्थ दौलत जोंधळे याच्यावर टिळकनगर, सांगवी येथील रहिवासी असलेला रवी हडसे याने त्याचे साथीदार अजय उर्फ बंटी लोणे व अतिष सुरेश चव्हाण यांच्या मदतीने तू आमच्याकडे रागाने का बघतोस असे म्हणून चाकुहल्ला करुन गंभीर जखमी केले. या घटनेत सिध्दार्थ जोंधळे जागीच ठार झाला. या प्रकरणी दुषांत जोंधळे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यातील आरोपी रवी हडसे व अजय उर्फ बंटी लोणे यांना अटक केली. या दोघांना बुधवारी (ता. १४) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एम. आर. यादव यांनी  त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल एम. एन. कसबे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा नांदेड : जिल्‍ह्यात गुरुवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार- वर्षा ठाकूर -

कोविड रूग्णांसाठी १० बेडची मोफत व्यवस्था

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना रूग्णांसाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख बळवंत तेलंग यांच्या स्वखर्चातून अशोका गोदावरी कोविड केअर सेंटर, आटीआय कॉर्नर, नांदेड या खाजगी रूग्णालयामध्ये १० बेडची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

बळवंत तेलंग हे स्वत: कोरोनावर मात करून सुखरूप आले असल्यामुळे त्यांनी कोरोना रूग्णांची होत असलेली अडचण जवळून पाहिली आहे. खाजगी रूग्णालयांचा खर्च भरमसाठ असून गोरगरिबांना तो झेपणारा नाही. यामुळे स्वत: काही रूग्णांसाठी आपल्याकडून काहीतरी मदत केली पाहिजे, या भावनेतून ही सेवा सुरू केली आहे.
जिल्ह्यातील गरीब कोरोना रूग्णांसाठी खाजगी रूग्णालयात स्वखर्चातून १० बेडची मोफत व्यवस्था केली आहे. गरजू गरीब कोरोना रूग्णांची होत असलेली अडचण पाहून हा उपक्रम राबविला आहे. कोरोना रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बळवंत तेलंग यांनी केले असून या सेवेचा लाभ गरजु रुग्णांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The killers of Siddharth Jondhale have been remanded in police custody for five days nanded news