Nanded : भक्ती व भावगीतांनी रसिक मंत्रमुग्ध; कंधारमध्ये रंगली कोजागरी पौर्णिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded  news

Nanded : भक्ती व भावगीतांनी रसिक मंत्रमुग्ध; कंधारमध्ये रंगली कोजागरी पौर्णिमा

कंधार : मधूर स्वर, त्याला तेवढ्याच दमदारपणे मिळालेली हार्मोनियमची साथ आणि ‘विठू माऊली तू माऊली जगाची-माऊलीत मूर्ती विठ्ठलाची’ हे भक्ती गीत, रसिक मंत्रमुग्ध, टाळ्यांचा कडकडाट...हे चित्र होते. रविवारी (ता.नऊ) कंधार मधील नगरेश्वर मंदिरात पार पडलेल्या कोजागिरी पोर्णिमेनिमित्त स्वरसंध्या कार्यक्रमाचे रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

हेही वाचा: Nanded : परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोजागिरी पोर्णिमेचे औचित्य साधून प्रसिद्ध गायक प्रा. अशोक ठावरे प्रस्तुत स्वर निनाद या मराठी, हिंदी गीते, भक्ती व भाव गीतांचा रंगारंग कार्यक्रमाचे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. नगरेश्वर मंदिरात श्रोत्यांच्या भरगच्च महेफिलीत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कंधारकरांना एकापेक्षा एक सरस भक्ती व भाव गीतांसोबत मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांची मेजवानी मिळाली. प्रा. अशोक ठावरे यांचा बुलंद आवाज संगीत संध्याचे आकर्षण ठरले. त्यांना स्वर निनाद मधील इतर गायक व गायिकांची उत्कृष्ठ साथ मिळाल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.

हेही वाचा: Nanded : कापसाच्या झाल्या वाती; सोयाबीनला कोंब

सर्व प्रथम साधू महाराज संस्थानचे मठाधिपती एकनाथ महाराज साधू, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बी.के. पांचाळ, प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, सुरेश राठोड, चित्ररेखा गोरे यांच्याहस्ते शक्तीच्या देवीची पूजा करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, प्राचार्य डॉ. जयमंगला औरादकर, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, महोमद जफरोद्दीन, निलेश गौर, दीपक आवाळे, मधुकर डांगे, कल्पना गीते, सुनंदा वंजे, वंदना डुमणे, मीना मुखेडकर, साईनाथ कोळगिरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. भाजप शहराध्यक्ष ॲड. गंगाप्रसाद यन्नावार यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.