

Nanded News
esakal
नांदेड: अनाथ, निराधार आणि गरजू बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना मागील दीड वर्षापासून जिल्ह्यात ठप्प असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याचा लाभ न मिळाल्याने जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बालकांच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनी व अशा मुलांचे संगोपन करणाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.