esakal | नांदेड - मध्यवर्ती बसस्थानकातील विश्रामगृहात सुविधांची वानवा 
sakal

बोलून बातमी शोधा

nanded Photo

आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या या विश्रामगृहाच्या दारासमोर पिंपळ व कडुनिंबाचे मोठे झाड आहेत. त्यामुळे परिसरात नेहमी पिकलेल्या पानांचा सडा असतो. परिसरात अनेक दिवसापासून झाडझुड, साफसफाई नसल्याने ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीगारे साठले आहेत.

नांदेड - मध्यवर्ती बसस्थानकातील विश्रामगृहात सुविधांची वानवा 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लांब पल्ल्याच्या एसटी बसेस जेव्हा रात्रीच्या वेळी शहरात मुक्कामाला येतात. तेव्हा वाहक आणि चालकास बसस्थानक परिसरात विश्रामगृहाची व्यवस्था असते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकात आगार प्रमुख यांच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विश्राम व परिसराची स्वच्छता नसल्याने विश्रामगृह परिसराला उकिरड्याची अवस्था आली असल्याचे दिसून येते. 

आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या या विश्रामगृहाच्या दारासमोर पिंपळ व कडुनिंबाचे मोठे झाड आहेत. त्यामुळे परिसरात नेहमी पिकलेल्या पानांचा सडा असतो. परिसरात अनेक दिवसापासून झाडझुड, साफसफाई नसल्याने ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीगारे साठले आहेत.

हेही वाचा- केरळच्या जिल्हा न्यायाधीशाला आॅनलाइन गंडा; आरोपीला नांदेडमध्ये अटक

विश्रामगृहात केवळ दोन लाईट, दोन जुने पंखे 

विशेष म्हणजे विश्रामगृहासाठी ना सुरक्षा रक्षक असतो. ना रोज साफसफाई होते. पिण्याच्या पाण्याची देखीव व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे कुणीही या अन् आराम करा अशी अवस्था असून, येणाऱ्या आणि जाणाऱ्या कर्मचारी यांची कुठेही नोंद ठेवली जात नाही. परिसरात सुरक्षागार्ड नसल्यामुळे विश्रामगृहाच्या आत आणि बाहेर दारुच्या व पाण्याच्या रिकामा बाटल्यांचा खच पडलेल्या दिसून येतो. त्याकडे कुणाचेही लक्ष नसते. जिर्णअवस्था प्राप्त झालेल्या या विश्रामगृहात दोन लाईट, दोन जुने पंखे आहेत. पंखे नादुरूस्त असल्यामुळे त्यांच्यावर छळमटे पडल्याचे दिसून येतात. 

हेही वाचा- नांदेड : वाळू माफियांचे महसूल विभागाला आव्हान; अवैध वाळू उत्खनन नद्यांच्या मुळावर

‘सकाळ’च्या पाहणीतुन वास्तव 

विश्रामगृहाच्या दोन्ही भिंतीला चालक, वाहकांच्या सामान असलेल्या लोखंडी पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्रामगृहास पार्सल कार्यालयाचे स्वरुप आले आहे. अतिशय धोकादायव व सुविधांची वानवा असलेल्या विश्रामगृहात दिवसभर थकुन भागुन आलेल्या एसटी चालक व वाहकांना रात्र काढावी लागत असल्याचे भिषण वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीतुन समोर आले आहे.  
 

loading image
go to top