शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेडची पीछेहाट, गुणवत्ता घसरली, चारच विद्यार्थी राज्यस्तरावर

file photo
file photo

नांदेड : जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर नांदेडची कामगिरी निराशाजनक राहिली. शहरी व ग्रामीण विभागातून फक्त चारच विद्यार्थी गुणवत्ता यादीत यशस्वी ठरले. विशेष म्हणजे पाचवीच्या शहरी विभागाच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नांदेडची पाटी कोरीच राहिल्याने यंदा गुणवत्तेचा बार फुसका निघाला आहे.

जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले असून त्यांच्याकडून चांगली तयारी करुन घेण्यात आली असताना राज्याचा निकाल पाहता त्यात जिल्ह्याची मोठी घसरण झाल्याने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची धरसोड वृत्ती या शिष्यवृत्ती परीक्षेकडे असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची साथ चालू झाल्यानंतरही शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य रित्या पार पडली असली तरी ऑनलाईन अध्यापन वर्ग चालविले. त्यामुळे शैक्षणिक स्तरावर त्यांचे कौतुक झाले. या उपक्रमात बहुतांश गुरुजींचे योगदान चांगले राहिले. याबाबत दुमत नसले तरी या प्रक्रियेत सातत्य टिकवले नसावे अशी शंका घेतली जात आहे.

साधारणतः शिष्यवृत्ती परीक्षा म्हटले की, नांदेडचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले आपण पाहिले आहे. दरवर्षी याचा प्रचंड गाजावाजासुद्धा होत असतो. यंदा सुद्धा या परीक्षेचा निकालाकडे नांदेडकरांचे लक्ष लागून होते. परंतु निकाल आल्यानंतर नांदेडच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही हे स्पष्ट झाले आहे. राज्यस्तरीय कामगिरी घसरली आहे. गुणवत्ता यादीत राऊत आणि पेटकुले सातवे, इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळेतील अनिरुद्ध प्रदीप राऊत आणि संस्कृती माधव पेटकुले हे दोघे सातव्या क्रमांकावर आले. शहरी गुणवत्ता यादीत एकही विद्यार्थी आलेला नाही. आठवीचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत जिज्ञासा विद्यालयाची क्षितीश दिगंबर नरवाडे हा चौदावा आहे. तर शहरी गुणवत्ता यादीतून केंब्रिज माध्यमिक विद्यालयाची शिवलीला भीमराव कुंभारगावे या विद्यार्थ्यांनी चौथ्या क्रमांकावर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com