esakal | नांदेड : राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यास उशिर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतकरी कर्जबाजारी, आत्महत्या, शेती विकण्याची वेळ, प्रशासन केव्हा जागे होणार..

नांदेड : राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यास उशिर

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अर्धापूर तालुक्यातून जाणा-या 361 राष्ट्रीय महामार्गसाठी संपादित केलेले शेतजमिनीचा मावेजाचा प्रश्न गेल्या तीन वर्षापासून भिजत पडला आहे. आज न उद्या आपल्या संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा मिळेल या आशेवर जागणा-या शेतक-यावर आत्महत्या करण्याची वेळ आली तरी भूसंपादन अधिकारी, निधी मंजूर करणारे अधिकारी मात्र एकमेकांवर चालढकल करित आहेत. सरकारी काम वर्षोंनूवर्षे थांब या धोरणामुळे शेतक-यांचा जीव मेटाकुटीला येत आहे.

अर्धापूर तालुक्यातील काळी कसदार जमिनी विविध प्रकल्पासाठी अधीगृहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे लागवडीखाली क्षेत्रातील जमिनी कमी होत आहेत तर दुसरीकडे शासनाने अधिगृहीत केलेल्या जमिनीसाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. 

अर्धापूर तालुक्यातून 361 हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. यासाठी मार्गासठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत अर्धापूर, लतीफपूर, जांभरूण आदी शिवारातील जमिनी अधिगृहीत केल्यानंतर मावेजा किती गुणांकाने देण्यात यावा याचा घोळ सुरु आहे. शेतक-यांची जादा मावेजा मिळाल्याची मागणी आहे. यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन जादा मावेजा मंजूर करून घेतला. पण ही मावेजाची फाईल तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे धुळघात पडली आहे. अर्धापूर, जांभरूण, लतीफपूर या शिवारातील शंभरराच्यावर शेतकरी मावेजाची वाट पाहत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image