नांदेड : भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यानी लाटला लाखोंचा मलिदा, शेतकऱ्याची तक्रार

गंगाधर डांगे
Monday, 12 October 2020

चार लाख वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केल्यामुळे संबधितां विरूद्ध आर्थिक फसवणूक .

मुदखेड (जिल्हा नांदेड) : येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी रवि श्रीरामे यांनी शेतजमिनीची मोजनी बरोबर करतो म्हणून माझ्या अशिक्षित पणाचा फायदा घेत चार लाख वीस हजार रुपये घेऊन फसवणूक केल्यामुळे संबधितां विरूद्ध आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन कायदेशीर कार्यवाही करावी अशा आशयाचे तक्रारी निवेदन पार्डी वैजापूर येथील पिडीत शेतकरी दिगांबर रामजी धमशेटवाड यांनी गृह आणि महसूल प्रशासनाकडे दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पार्डी वैजापुर येथील शेतकरी दिगांबर धमशेटवाड यांनी शेत गट नं.१२२, १२३ ची मोजणी करण्यात आली. परंतु त्याची हद्द कायम करुन देतो म्हणून ती कायम करण्यात आली नाही. असे असे तक्रारदार शेतकर्यांचे लेखी म्हणणे आहे.

हेही वाचासबसिडीसाठी ग्राहकांना सोसावा लागतोय आर्थिक भूर्दंड

सदर गटामध्ये उर्वरित शिल्लक जमिन निघते ती सुध्दा मोजून खुना निश्चित करुन देतो व गट क्रमांक १२४ मधील शेती सातबारा उत्तारावर नाव लावून देतो त्यासाठी मला व माझ्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे भुमिअभिलेख कार्यालय मुदखेड येथील कर्मचारी रवि श्रीरामे यांनी सांगितले. त्यानुसार माझे नाते वाईक शिवाजी लाठकर यांच्या समक्ष माझे शेतीचे काम होईल व शिल्लक जमिनीही आपल्या नावे लागेल या आशेने श्रीरामे यांनी २९ जून २०२० रोजी मुदखेड बायपास रोडवर तब्बल तीन लाख रुपये दिले. त्यानंतर पुढचे काम करण्यासाठी राहिलेले एक लाख वीस हजार रुपये द्या म्हणून श्रीरामे यांनी सांगितले.त्यानंतर १८ जुलै २०२० रोजी मी पुन्हा एक लाख रुपये भोकर फाटा या ठिकाणी  दिले. अजून २९ जुलै २०२० वीस हजार रुपये नक्कल पत्र देण्यासाठी श्रीरामे यांना दिल्याचे पिडीत शेतकरी दिगांबर धमशेटवाड यांनी आपल्या तक्रारी निवेदनात नमुद केले आहे.

माझे कामा विषयी श्रीरामे यांना विचारणा केली असता काम झाल आता कशाचे काम आहे. अस म्हणून ते टाळाटाळ करित आहेत. आपली आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समजल्यानंतर मी न्याय मिळण्याच्या मागणी साठी अर्ज करित असून मला संबंधिता कडून आपमानित करण्यात आलेले आहे.

येथे क्लिक करा - तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू

श्रीरामे व लाठकर यांच्यातील अर्जातील नमूद दिनांकाचे भ्रमणध्वनीवरील संभाषण तपासले आणि संबंधितांची नार्को टेस्ट केली तर माझ्या सारख्या गरिबांची खरोबर आर्थिक फसवणूक केल्याची बाब निदर्शनास येईल असे पीडित शेतकरी धमशेटवाड यांचे म्हणणे आहे.माझ्या अशिक्षित पणाचा फायदा घेत आर्थिक फसवणूक केली असल्यामुळे संबंधिता विरूद्ध कायदेशीर कार्यवाही करावी व माझे चार लाख वीस हजार रुपये परत मिळवून द्यावेत अशी मागणी ही आपल्या लेखी निवेदनात दिगांबर धमशटेवाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण,जमाबंदी आयुक्त भुमिअभिलेख कार्यालय पुणे, जिल्हाधिकारी डॅा.विपीन ईटनकर, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Land records office staff laundered lakhs of rupees, farmers complain nanded news