
नांदेड : पोलिसांची मिलीभगत की निष्काळजीपणा
नांदेड : शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णतः कोलमडली असताना पोलिस सतर्क होतील असा अंदाज होता. परंतु तो चुकीचा ठरत असणारी घटना रविवारी पहाटे कैलासनगर येथे घडली आहे.
नीटच्या अभ्यासक्रम तयारीसाठी आलेल्या तरुणाने त्या लुटारूस पकडून ठेवले. परंतु भाग्यानगर पोलिस एक तासांपर्यंत घटनास्थळी गेलेच नाही. या प्रकाराने पोलिसांची मिलीभगत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटचा अभ्यासक्रम पुर्ण करणारा गडचिरोली येथील निदेश दुर्गे हा तरुण रविवारी सकाळी गावाकडे जाण्यास निघाला. पहाटे साडेचारच्या सुमारास तो रेल्वेने जाण्यासाठी अशोकनगर, भाग्य नगर मुख्य रस्त्यावर आॅटोची वाट पाहत थांबला होता.
थोड्याच वेळात एका दुचाकीवर तिघेजण तेथे आले. त्यांनी त्याला कोठे जायचे असे विचारून आम्ही तुला सोडतो असे सांगितले. त्यावर श्री. दुर्गे याने त्यांना होकार देत गाडीवर गाडीवर बसला. मात्र, दुचाकीवरील आरोपींनी दुर्गेला कैलास नगर मध्ये नेऊन मारहाण करून त्याच्याकडील एक हजार ७०० रुपये काढून घेतले. या वेळी त्याने तिन्ही आरोपींना पकडून ठेवून आरडाओरड केली.
त्यामुळे शेजारील नागरिक धावून येत भाग्यनगर पोलिसांना त्याची माहिती दिली. परंतु साखर झोपेचे सोंग घेणारे पोलिस तब्बल एक तास घटनास्थळी पोहचलेच नाहीत. अनेक वेळा फोन व नंतर पोलिस नियंत्रण कक्षाला दोन वेळा फोन केल्यानंतर स्कुटीवर महिला पोलिस व दुसऱ्या स्कुटीवर एक पुरुष पोलिस आला. त्यांनी लुटारुंना ताब्यात घेतले. लुटारु अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
Web Title: Nanded Law And Order Completely Disarray Police Arrived Late At Scene
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..