esakal | नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी जेरबंद- एलसीबी 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. पाच ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून येणाऱ्या किशन जाधव यांना खुरगाव पाटीजवळ अडविले. त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

नांदेड : शस्त्राचा धाक दाखवून वाटमारी करणारी टोळी जेरबंद- एलसीबी 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड- मालेगाव रस्त्यावरील खुरगाव पाटीजवळ पाच ऑक्टोबर रोजी वाटमारी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले साहित्य व घातक शस्त्र जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. तीन) रात्री केली. या दोन्ही चोरट्यांना अर्धापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

ता. पाच ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून येणाऱ्या किशन जाधव यांना खुरगाव पाटीजवळ अडविले. त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. अतिश सूर्यवंशी व सलमान ऊर्फ मडगार्ड हे दोघे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ यांच्या पथकाला या भागात गस्त घालण्यास सांगितले. त्यानंतर श्री. पांचाळ यांनी आले सहकारी बालाजी हिंगणकर, गजानन बैनवाड, पद्मसिंह कांबळे, संजय जिंकलवाड, सलीम बेग, अर्जुन शिंदे आणि महिला पोलिस पठाण यांना सोबत घेऊन अर्धापूर तालुक्यात गस्त घालण्यास सुरवात केली. 

हेही वाचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खबरदारी घेतली नाही तर....

दोन्ही चोरट्यांना अर्धापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी 

मात्त हे चोरटे त्यांना नांदेड शहरात असल्याचे समजले. यावेळी हे पथक रात्री परत शहरात दाखल झाले. यावेळी त्यांना अतिश सूर्यवंशी आणि सलमान उर्फ मडगार्ड तिरंगा चौकात दिसले. पोलिसांना पाहून हे दोघे पळाले. पक्कीचाळमधुन वाहणाऱ्या नाल्यातील काटेरी झुडपांमध्ये या दोघांचा पाठलाग करून पोलिस पथकाने या दोघांना अखेर पकडले. अर्धापूर पोलिस हद्दीतील खुरगाव पाटीजवळील वाटमारीचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला एक मोबाईल व आदी साहित्य जप्त केले. या दोन्ही चोरट्यांना अर्धापुर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पथकाचे कौतुक केले, या दोन्ही चोरट्यांना अर्धापूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.