
नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, वंचित हे सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी भाजपने कंबर कसली असून नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली मोर्चेबांधणी करत शहरातील ६१२ पैकी ५४२ बूथ गठित केले आहेत. भाजपने आतापर्यंत शहरातून तब्बल ८८ हजार नव्या सदस्यांची प्राथमिक नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने जोरदार पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे.