Lok Sabha Election : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी नऊ, एकूण २० अर्ज दाखल

बुधवारी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत.
nanded lok sabha election candidate nomination file last day
nanded lok sabha election candidate nomination file last daySakal

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. ४) शेवटचा दिवस शिल्लक आहे. बुधवारी (ता. ३) दिवसभरात एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

बुधवारी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात १९ अर्जांची उचल करण्यात आली आहे. आतापर्यंत १४५ अर्ज उचलण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे.

बुधवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये वसंतराव चव्हाण (काँग्रेस), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत) यांच्यासह लक्ष्मण नागोराव पाटील, तुकाराम गणपत बिराजदार, मोहम्मद वसीम, मोहम्मद सिद्दिकी शेख संदलजी, भास्कर चंपतराव डोईफोडे आणि असलम इब्राहिम शेख (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.

अर्जांची छाननी शुक्रवारी होणार

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभेची निवडणूक होत आहे. ता. २८ मार्च ते ता. ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी एक दिवस अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकराला जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवारी (ता. ८) दुपारी तीनपर्यंत देता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com