esakal | Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

कोरोनाचा वाढता प्रादूर्भावामुळे चार ते पाच महिण्यापासून खादीवस्त्रांची निर्मिती व विक्री बंद ठेवण्यात आली होती. यादरम्यान इतर उद्योग व्यवसायाप्रमाणेच खादीला देखील त्याची झळ बसली आहे. महात्मा गांधी जयंतीजवळ येत असताना खादीप्रेमींनी नेहमीप्रमाणे खादीवर सुट मिळणार की नाही, अशी खादीप्रेमींकडून विचारणा होत होती. आधीच कोट्यावधींचा फटका बसलेल्या खादीवस्त्रावर गांधी जयंती ते भाऊबीजपर्यंत खादीवस्त्रावर सुट द्यावी की नाही हा आमच्यासमोरील सर्वात मोठा प्रश्‍न होता.

Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - खादीच्या नावाखाली अनेक वस्त्र विकली जातात. त्यावर भरघोस अशी सुट दिली जाते. सुट देत असताना दुसरीकडे मात्र ग्राहकांना जुन्या स्टॉकमधील न विकणारा माल ग्राहकांच्या माथी मारुन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. सुट देऊन लुट करणे हे खादीच्या तत्वात बसत नाही असे मराठवाडा खादी ग्रामोद्योगचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी सांगितले.  

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता. दोन) खादी भांडार हनुमानपेठ येथे कोविडच्या नियमांचे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री.किनगावकर बोलत होते. याप्रसंगी श्री.गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष सुधीर कोकरे, नवीन भाई ठक्कर, सहायक धर्मादाय आयुक्त किशोरजी मसने, भांडारप्रमुख विश्वनाथ नांदेडे यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील एका कुटुंबातील पाच जणांनी घेतली सहस्त्रकुंड धबधब्यात उडी ​

भाऊबीजपर्यंत खादीवस्त्रावर सुट

पुढे बोलताना श्री. किनगावकर म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादूर्भावामुळे चार ते पाच महिण्यापासून खादीवस्त्रांची निर्मिती व विक्री बंद ठेवण्यात आली होती. यादरम्यान इतर उद्योग व्यवसायाप्रमाणेच खादीला देखील त्याची झळ बसली आहे. महात्मा गांधी जयंतीजवळ येत असताना खादीप्रेमींनी नेहमीप्रमाणे खादीवर सुट मिळणार की नाही, अशी खादीप्रेमींकडून विचारणा होत होती. आधीच कोट्यावधींचा फटका बसलेल्या खादीवस्त्रावर गांधी जयंती ते भाऊबीजपर्यंत खादीवस्त्रावर सुट द्यावी की नाही हा आमच्यासमोरील सर्वात मोठा प्रश्‍न होता. मात्र, खादीप्रेमींचा हिरमोड होऊ नये म्हणून नफ्या तोट्याचा विचार न करता लॉकडाउनकाळात देखील खादीच्या सर्व वस्त्र आणि वस्तूवर सुट देण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे श्री. किनगावकर यांनी सांगितले. 

हेही वाचले पाहिजे- Video - जंगलराज विरोधात काँग्रेस रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत आंदोलन ​

खादीवस्त्राचा वापर करण्याचे आवाहन 

या वेळी अध्यक्ष म्हणून बोलताना सुधीर कोकरे म्हणाले, खादी हे केवळ वस्त्र नसून हा विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला प्रोत्साहन देण्यासाठी खादीवस्त्राचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या अवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. खादीप्रेमींकडून खादीला असेच प्रोत्सहान मिळ राहिले तर खादीला चांगले दिवस येतील असा विश्‍वास श्री.कोकरे यांनी या वेळी व्यक्त केला. शेवटी भांडारपाल विश्‍वनाथ नांदेडे यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.

loading image
go to top