नांदेड : निष्ठावान शिवसैनिक कोरोनाने हिरावला, लोहा शहरावर शोककळा

file photo
file photo

लोहा  (जिल्हा नांदेड) : निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेले रामभाऊ चन्नावार ( वय ६९) यांचे बुधवारी ( ता. दोन) सकाळी  कोरोनानेे व अल्पशा आजाराने हैैैराबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुुुुलगा  , नातवंडे  असा मोठा परिवार आहे. 

नांदेड जिल्ह्यात  नव्वदच्या दशकात शिवसेना शाखा स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. सबंध जिवनभर शिवसेनेचे कार्यकर्ते  म्हणून ते वावरले. पक्षाचे कुठलेही  पद स्वीकारले नाही हे विशेष !

लोहा नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदावर ते निवडून आले.

माजी आमदार रोहिदास चव्हाण यांना सेनेचे जिल्हाप्रमुख पद आणि सन ९२ पासून सलग दोन वेळा लोहा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी यांचे मोलाचे सहकार्य  होते. राजकीय क्षेत्रात विशेषतः शिवसेनेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. प्रारंभी लोहा नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदावर ते निवडून आले.  त्यानंतर लोह्याच्या बाजार समितीचे उपाध्यक्षपदी विराजमान होते. कापूस  पणन महासंघाचे प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले. विमा सल्लागार आणि संजय गांधी निराधार योजनेचे लोहा तालुकाध्यक्ष पदी  राहिले आहेत. 

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी केला शोक व्यक्त

मराठी रंगभूमीवर स्थानिक  नाट्यलेखकांना वाव दिला. फडाचा तमाशा, संगीत बारी, खास करून  'लावणी' या लोककला प्रकारात त्यांनी कलावंतांना राजाश्रय मिळवून दिला. त्यांनी लोह्यात सांस्कृतिक चळवळ उभी केली. माळेगाव यात्रा प्रशासकीय स्तरावर चालवण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते दिलखुलास, मनमोकळेपणा, प्रेमळ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, सेनेचे  ज्येष्ठ मार्गदर्शक शेवटच्या क्षणापर्यंत कट्टर व कडवट  राहिले. हिंदू हृद्यसाम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सानिध्य लाभलेले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटचे संबंध होते. खासदार हेमंत पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, खासदार प्रतापराव चिखलीकर, अशोक चव्हाण, आमदार श्यामसुंदर शिंदे, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण, अॅड.  मुक्तेश्वर धोंडगे, हरिभाऊ चव्हाण, गणेश कुंटेवार, चंद्रकांत  नळगे आदींनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली .

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com