नांदेड : मालेगाव, कामठा, लहान, येळेगाव ग्रामपंचायत निवडणूक होणार लक्षवेधी, गावपुढारी लागले कामाला

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची धामधूम सुरु झाली असून गावपुढारी कामाला लागले आहेत. तालुक्यातील मोठ्या व राजकीयदृष्ट्या सतत चर्चेत राहणा-या मालेगाव, कामठा, लहान, येळेगाव, पिंपळगाव, पार्डी येथील निवडणूक लक्षवेधी व आतितटीची होणार आहे. तालुक्यातील गावातील राजकारण तापत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवार, पॅनल, जातीचे प्रमाणपत्रांची जुळवाजुळव  सुरु झाली आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती काॅग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे ही या निवडणूका काॅग्रेसच्या दोन स्थानिक गटात होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने परगावी राहणारे व अधून- मधून येणारे पुढारी गावात दिसून येत आहेत. मतदारांशी संवाद साधणे, राजकीय वातावरणाविषयी माहिती घेणे आदींची चर्चा होत आहे.

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये यंदा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील मालेगाव ग्रामपंचायत सर्वात मोठी असून राजकीयदृष्ट्या महत्वाची आहे. येथील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असून १५ सदस्य आहेत. गेल्या निवडणुकीत  डाॅ लक्ष्मण इंगोले यांच्या गटाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर त्यांनी सेवासहकारी संस्था निवडणूक जिंकली. तसेच अपक्ष निवडणूक लढवून पंचायत समितीचे उपसभापती झाले. त्यामुळे तिन पॅनलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

लहान ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या वेळेस बिनविरोध झाली होती. यासाठी स्थानिक नेत्यांनी राजकीय मतभेद विसरुन गावाच्या विकासासाठी एकत्र आले. गेल्या पाच वर्षात गावाचा विकास झाला असून पुरस्कारही मिळाला आहे. यंदा स्थानिक दोन गटातील पॅनलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

येळेगाव येथील सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असून येथे १३ सदस्य निवडून येतात. गेल्या वेळेस येथील निवडणूक अटीतटीची झाली होती. दोन पॅनलमध्ये झालेल्या लढतीत सामना सात-सहा असा सुटला होता. काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती आनंदराव कपाटे यांच्या गटाचे सात व त्यांच्या विरोधी गटाचे सहा सदस्य निवडून आले होते. गेल्या पाच वर्षात ब-याच राजकीय घडामोडी झाल्या आहेत. येथील निवडणूक दोन पॅनलमध्ये होईल.

कामठा येथील ग्रामपंचायतीमध्ये काॅग्रेसचे शिवलिंग स्वामी यांच्या गटाला गेल्या दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत असून त्यांच्या नेतृत्वाखाली तिस-यांदा निवडणुक लढवली जाणार आहे. गेल्या दहा वर्षात घरकुल, स्वच्छालय, रस्ता, नाल्याची कामे झाली आहेत. तसेच जलसंधारण, अंगणवाडी शैक्षणिक आदी कामे झाल्याचा दावा सरपंच शिवलिंग स्वामी करित आहेत. येथील सरपंचपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.

तर मोठ्या ग्रामपंचायती आसलेल्या पिंपळगाव व पार्डी येथील सरपंचपद हे अनुसुचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आसल्यामुळे सध्यातरी वातावरण शांत आहे. आपल्या गटाचा सरपंच करण्यासाठी गावपातळीवर नेते व गट कामाला लागले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com