नांदेड : मनसैनिकांचे महावितरण कार्यालयावर खळ्ळखट्ट्याक, काय आहे प्रकरण वाचा?

गंगाधर डांगे
Monday, 7 September 2020

वाढीव विज बिल प्रकरणी मनसैनिकांनी विदयुत वितरणचे कार्यालय तोडले. दोन लाखाचे नुकसान; पोलिसात तक्रार

मुदखेड : मुदखेड येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता कार्यालयात आज मनसैनिकांनी अचानक हल्लाबोल करून कार्यालयातील संगणक संगणक साहित्य टेबल-खुर्च्या व मीटरची रिडींग घेण्याची मशीन तोडफोड करून धुडगूस घातला या तोडफोडीत विद्युत वितरण चे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याची तक्रार मुदखेड पोलिसात घटनेनंतर येथील सहाय्यक अभियंता विकास खोबरागडे यांनी दिली आहे.

मुदखेड येथे वाढीव वीज बिल कमी करा करून द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुदखेडच्या वतीने महावितरण अभियंता मुदखेड यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची त्यांनी दखल न घेताच ग्राहकांना वाढीव वीज बिल वाटप करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुदखेड येथील अभियंता महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २० हुन अधिक कार्यकर्ते अभियंता महावितरण कार्यालय मुदखेड या ठिकाणी सोमवारी सकाळी ११ वाजता दाखल झाले. महावितरण कार्यालयात उपस्थित असणाऱ्या अधिकार्‍यांना त्यांनी वाढीव वीज बिलाबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात वर जाब विचारला. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा -  नांदेड - घरांची मागणी वाढण्याला लॉकडाउन कारणीभूत, कसे ते वाचा... -

कार्यालयातील साहित्याची तोडफोड

त्यावर त्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी कार्यालयात राज ठाकरे  यांच्या नावाने घोषणा देत त्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. विज बिल माफ न केल्यास आणखीन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून महावितरणला देण्यात आला.

दोन लाखाचे नुकसान : खोब्रागडे

आज सकाळी ११ वाजता अचानक कार्यालयांमध्ये वीस-पंचवीस मनसैनिक कार्यकर्त्यांनी घुसून राज ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत कार्यालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली या तोडफोड मध्ये कार्यालयातील तीन संगणक, तिन टेबल, टेबल वरील काच, खुर्च्या व मीटर रीडिंग घेण्याच्या एम आर आय मशीन ची तोडफोड केली यामध्ये कार्यालयाचे जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाले.

विकास खोबरागडे, सहाय्यक अभियंता, विद्युत वितरण मुदखेड

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Mansainiks stormed the MSEDCL office nanded news