Nanded : दिवाळीनिमित्त बाजारपेठा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali

Nanded : दिवाळीनिमित्त बाजारपेठा सज्ज

नांदेड : दिवाळीचा सण आला की सर्व बाजारपेठा सज्ज होतात. दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने सगळीकडे ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. दिवाळीनिमित्ताने लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

बाजारात कपडे, फराळ, आकर्षक कंदील, पणत्या, रांगोळी आणि विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू, घरगुती पदार्थ, अनेक महिलांनी घरी बनवलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी इको फ्रेंडली वस्तूंना जास्त प्रमाणात प्राधान्य दिले आहे.

टिकल्या, घुंगरु, काच, चकाकणारी चमकी अशा सजावटींच्या वस्तू वापरुन बनवलेल्या डिझायनर पणत्यांना बाजारात जास्त आवक आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक लाल मातीपासून तयार केलेल्या पणत्यांची आवड अजूनही कायम आहे. बाजारात १० रुपयांपासून ते २५०-३०० रुपयांपर्यंतचे दिवे विक्रीसाठी आले आहेत. त्याशिवाय रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणा-या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे साचे बाजारात आले आहेत.

अशा आहेत किंमती

लालमातीचे साधे, छोटे दिव्यांची किंमत ः २० रुपये

रंगीबेरंगी पण साधे दिव्यांची किंमत ः ३० रुपये

चकमकी, काच, मणी इत्यादी पासून सजवण्यात आलेल्या

दिव्यांची किंमत ः ८० ते १०० रुपयांपासून सुरु