नांदेड : कोटितीर्थ पंपगृहातील कामाची महापौरांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : कोटितीर्थ पंपगृहातील कामाची महापौरांकडून पाहणी

नांदेड : कोटितीर्थ पंपगृहातील कामाची महापौरांकडून पाहणी

नांदेड ः नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोत असलेल्या कोटितीर्थ पंपगृहाच्या कामाच्या प्रगतीची पाहणी शुक्रवारी (ता.१९) महापौर जयश्री निलेश पावडे यांनी केली. या वेळी स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, आयुक्त डॉ. सुनील लहाने, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, अभियंता संघरत्न सोनसळे, सतिश ढवळे, उपअभियंता गोकुळे, कनिष्ठ बोडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

नांदेड शहराला पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या कोटितीर्थ पंपगृह १९९७ मध्ये उभारण्यात आला होता. तद्नंतर नांदेड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता या पंपगृहात २००८ मध्ये नवीन सहा पंप बसविण्यात आले. २००८ ते २०२१ या कालावधीत पंपाचे आर्युमान संपल्यामुळे पाणी उपसाची क्षमता कमी झाल्यामुळे पाण्याचा तुटवडा होत होता. शिवाय सदरील पंप वारंवार नादुरूस्त होत असल्याने येथे नवीन पंप बसविणे आवश्यक होते. या पंपामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकात आकारण्यात येणाऱ्या पॉवर फॅक्टरचा दंड कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा पैसा बचत होईल. शिवाय सर्व जलशुद्धीकरण केंद्र, पंपगृह, मल शुद्धीकरण केंद्र आणि मलउपसा केंद्रावर ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कामे प्रगती पथावर असून या कामानंतर नांदेडकरांना मुबलक पाणीपुरवठा होईल असा विश्‍वास महापौर जयश्री पावडे यांनी व्यक्त केला.

loading image
go to top