esakal | नांदेड : वाजेगाव ग्रामपंचायतमध्ये एमआयएम उतरणार - फेरोज लाला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

देशभरात वेगवेगळ्या निवडणुका लढवून सर्वांचे लक्ष केंद्रित करणाऱ्या एमआयएमने मुस्लिम मतदार बहुल ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्याचा निर्धार केला असून नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षाचे स्वतंत्रपणे पॅनल उभे करण्यात येणार आहे

नांदेड : वाजेगाव ग्रामपंचायतमध्ये एमआयएम उतरणार - फेरोज लाला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नुकत्याच झालेल्या बिहार व त्यानंतर हैद्राबादमधील निवडणुकीत यश मिळविल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एमआयएम सज्ज झाला आहे. शहराला लागूनच असलेल्या मुस्लीम बहुल वाजेगाव ग्रामपंचायत लढविणार असल्याचे एमआयएमचे फिरोज लाला व साबेर चाऊस यांनी सांगितले. 

देशभरात वेगवेगळ्या निवडणुका लढवून सर्वांचे लक्ष केंद्रित करणाऱ्या एमआयएमने मुस्लिम मतदार बहुल ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्याचा निर्धार केला असून नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत या पक्षाचे स्वतंत्रपणे पॅनल उभे करण्यात येणार आहे. वाजेगावात मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने येथे पक्षाला यश मिळेल आणि गाव पातळीवरील राजकारणात पक्षाचा प्रवेश होईल असे या पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचानांदेड : नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करा- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर -

सर्वप्रथम नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक निवडून आल्यानंतर चर्चेत आलेल्या या पक्षाची नंतर पिछेहाट झाली. पण राज्यात मुस्लिम बहुल शहरातून या पक्षाने निवडणूक लढविण्याचे सत्र सुरु ठेवले. काही महिन्यापूर्वी झालेल्या बिहारमधील निवडणुका आणि हैदराबाद महापालिका निवडणुकीत या पक्षाने मिळविलेले यश सर्वांचे लक्ष केंद्रित करणारे ठरले होते. त्यामुळे देश व राज्य स्तरावर याबाबतची चर्चा होत आहे. या पक्षाचे स्थानिक पुढारी मराठवाडा अध्यक्ष फेरोजलाला आणि शहराध्यक्ष साबेर चाऊस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष वळविले आहे.

नांदेड तालुक्यातील वाजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत राहणाऱ्या मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. येथील मुस्लिम मतदारच कोणत्या पक्षाला निवडून द्यावयाचे ठरवितात आणि सरपंचपदी त्यांनी निवडून दिलेला उमेदवार आतापर्यंत विराजमान झालेला आहे. येथील सामाजिक गणित लक्षात घेता एमआयएमने येथून पक्षाचे पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

loading image