नांदेड : बारडच्या गटारनाल्याची घेतली मंत्रालयाने दखल

ग्रामपंचायतद्वारे नाला सफाई सुरू : जनहितासाठी ‘सरकार पोर्टल’ महत्त्‍वाचे
Nanded Ministry notice of Nala cleaning started by Gram Panchayat
Nanded Ministry notice of Nala cleaning started by Gram Panchayatsakal

बारड : येथील मुख्य गटारनाल्याची गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई केली जात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यानंतर याबाबत थेट सरकार पोर्टल द्वारे थेट तक्रार दाखल करण्यात आल्याने ग्रामविकास मंत्रालयाने दखल घेऊन आदेश मिळताच ग्रामपंचायतने जेसीबीच्या साहाय्याने मुख्य नाल्याची साफसफाई करण्यास सुरुवात केल्याने ग्रामविकासात ‘सरकार पोर्टल’च्या भूमिकेचे महत्व अधोरेखित होते.

गुंफा या वस्तीतून ज्ञानदीप नगरकडे जाणारा मुख्य नाला (वार्ड क्र.दोन) तुडुंब भरल्याने गटारगंगेचे स्वरूप आले होते. याबाबत संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रार करूनही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात होते. नाल्याच्या बाजूला दुर्गंधी सुटल्याने रस्त्यावरून जाता येनाऱ्यांना नाकास रुमाल बांधायची वेळ आली होती. या नाल्यात पाळीव प्राण्याचा मृत्यूही झाला होता. परंतु स्थानिक प्रशासन मात्र स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर नसल्याने गावच्या हितासाठी अनेक वर्तमानपत्रातून बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या. यानंतर बातम्यांचा राग मनात घेऊन गाव पुढाऱ्यांनी नाला उपसण्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवली होती.

मुख्य नाला साफसफाई संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामसभेत मुद्दाही उपस्थित केला होता. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित वस्तीतील नागरिकांच्या हेतुवरच शंका घेऊन नाला सफाई करणे टाळण्यात आले. गटविकास विकास अधिकारी यांच्याकडेही या प्रश्नासंबंधी लक्ष वेधले असता हा प्रश्न काही सुटला नाही. यानंतर ‘सरकार पोर्टल’च्या साहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागात तक्रार करण्यात आली होती. गावकऱ्यांच्या अस्वच्छतेच्या तक्रारीची मंत्रालयाने गंभीरपणे दखल घेऊन मुख्य नाला साफसफाई करण्याचे आदेश दिले.

तसेच तक्रारीचे योग्य निवारण झाले का? नाही यासाठी संबंधित तक्रारदारास ग्रामपंचायतने माहिती द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यानंतर ग्रामपंचायतने लगबगीने जेसीबीचा फौजफाटा घेऊन मुख्य नाल्याची साफसफाई सुरू केली आहे. शिवेसना भाजप युतीच्या काळात २०१५-१६ मध्ये सामान्य नागरिकांच्या समस्याची दखल स्थानिक प्रशासन घेत नसेल तर नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन त्या समस्या निवारण करण्यासाठी युती सरकारने सरकार पोर्टलची स्थापना केली आहे. या नाला सफाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून यानंतरही ग्रामपंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणार का? असे आता बोलले जात आहे.

‘सरकार पोर्टलद्वारे’ संबंधित नाल्याविषयी शासनाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर हा नाला उपसल्या जात असून त्यांनतर संबंधित अहवाल तक्रारदार आणि शासनाला पाठवला जाईल.

- अनुप श्रीवास्तव, ग्रामविकास अधिकारी.

सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी फडणवीस सरकारने परिणामकारक सरकार पोर्टलची स्थापना केली होती. लोकशाहीत नागरिकांच्या मूलभूत गरजांवर टाच आणली जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. हे पोर्टल लोककल्याणकारी असून नागरिकांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर करून आपल्या समस्या सरकार पर्यंत पोहचविणे हा उद्देश या पोर्टलचा आहे.

- प्रा. संदीप कुमार देशमुख, बारड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com