नांदेड : विविध संघटनांतर्फे आमदार 'मिटकरी' यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded MLA Amol Mitkari against organization Protest

नांदेड : विविध संघटनांतर्फे आमदार 'मिटकरी' यांचा निषेध

नांदेड : आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले आहे.

निदर्शनामध्ये अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्ष, शौर्य प्रतिष्ठान, बीबीएन फाऊंडेशन, परशुराम सेना, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राम्हण महासंघ, पुरोहित महासंघ, आर्य चाणक्य सेना आदी संघटनांचा समावेश होता. जोरदार घोषणाबाजी करून तसेच प्रतिकात्मक पुतळ्याचे दहून करून आमदार मिटकरी यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी निखिल लातूरकर, प्रवीण साले, गणेश कोकुलवार, सतीश गुरु पोतदार, गजानन गुरु कळगावकर, कृष्णा बेरळीकर, संतोष परळीकर, अनिल डोईफोडे, रमाकांत जोशी, बंडूभाऊ कुंटूरकर, धनंजय कुलकर्णी, विजय जोशी, आशिष नेरलकर, प्रीती वडवळकर, मनिषा कुणसावळीकर, भाग्यश्री कुलकर्णी, अपर्णा मोकाटे, अर्चना शर्मा, अपर्णा चितळे, मंजूषा व्यवहारे, भालचंद्र पत्की, केदार नांदेडकर, अंबादास जोशी, मारोती वाघ, आदित्य जोशी, गिरीष पुजारी, प्रसाद जोशी, गजानन बंडू जकाते, विजय गंभीरे, अॅड. दिलीप ठाकूर, अशोक पाटील धनेगावकर, शीतल खांडील, डॉ. बालाजी गिरगावकर, दिलीपसिंघ सोडी, अनिलसिंह हजारी, मनोज जाधव, बजरंगसिंह परिहार, अंकुश पार्डीकर, राजाराम टोम्पे, नितीन गायकवाड, बालाजी सूर्यवंशी, गुणाल गजभारे, अक्षय अमिलकंठवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Nanded Mla Amol Mitkari Against Organization Protest Statement Deputy Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top