नांदेडच्या आमदारांची कुटुंबियांसह कोरोनावर मात...

काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे
काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे

नवीन नांदेड - नांदेडमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह कुटुंबियांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी (ता. सहा) त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून ते कुटुंबियांसह नांदेडला परतले आहेत.

काही दिवसाखाली आमदार हंबर्डे हे कामाच्या निमित्ताने माजी महापौर आणि नगरसेवक यांच्यासह इतरांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे तेही कोरोना बाधित झाल्याचे अहवाला आले. त्यानंतर यांच्या संपर्कात आलेल्या ४८ व्यक्तींपैकी परिवारातील दहा सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांना येथील नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. आता सोमवारी ते कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

कोरोना संकटाशी यशस्वी लढा
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी मुंबईत उपचार घेऊन कोरोनावर मात केली. त्यानंतर आमदार मोहन हंबर्डे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य या कोरोनाचा विळख्यात सापडले. त्यामुळे खळबळ उडाली. त्यात चिमुकल्यांचाही समावेश होता. दरम्यान, औरंगाबाद येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आमदार हंबर्डे आपल्या कुटुंबियासह कोरोना संकटाशी शर्तीने यशस्वी लढा देत परत आले.

कुटुंबातील दहाजण बाधित
आमदार हंबर्डे यांच्या संपर्कात आलेल्या ४८ व्यक्तींपैकी परिवारातील दहा सदस्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह व्यतिरिक्त इतर कर्मचारी सुरक्षारक्षक, वाहनचालक, वॉचमॅन, काही मित्रपरिवार यांना आपल्यामुळे संसर्ग झाला असेल? या शंकेने त्यांची देखील आरोग्याची काळजी घेत आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, यासाठी त्या सर्वांना घरी बोलवून आपल्यासोबत त्यांचे ही स्वॅब तपासणीसाठी पाठवले. सुदैवाने या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

मोकळा स्वभाव म्हणून परिचित 
आमदार हंबर्डे आपल्या मोकळ्या स्वभावाने सर्व परिचित आहेत. २४ तासात कधीही फोन करा ते स्वतःच उचलतात व जनतेचे प्रश्न फोनवर सोडविण्यासाठी प्रयत्न करतात, असा अनेकांचा अनुभव आहे. कुठल्याही परिस्थितीत जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवणे ही सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. नेहमी प्रशासनाला संपर्क साधून जनतेचे काम प्रत्यक्ष करण्याचे निर्देश या दरम्यान दिलेली आहेत.

कुठे प्रसाद तर कुठे अनवाणी पायी प्रार्थना  
दरम्यान, आमदार मोहन हंबर्डे आणि त्यांचा परिवार कोरोनामुक्त व्हावा, यासाठी कारेगावचे उपसरपंच मधुकर दिघे पाटील यांनी अनवाणी पायाने राहण्याचा संकल्प केला होता. जोपर्यंत आमदार कोरोनामुक्त होणार नाहीत तोपर्यंत आपण पायात पादत्राणे घालणार नाही, असे मधुकर दिघे पाटील यांनी ठरवले होते तर श्रीकांत मांजरमकर यांच्यावतीने नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com