Nanded : महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nanded : महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण केल्याने शिक्षा

नांदेड : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साडे दहा वर्षांपूर्वी बोळसा (ता. उमरी) येथे मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश वाय. एम. एच. खरादी यांनी एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.

बोळसा येथे ता. चार फेब्रुवारी २०१२ रोजी देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. या प्रसंगी डीपीमध्ये फ्युज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे आले आणि तंत्रज्ञ पांडुरंग मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली, असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत श्री मोरे यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. राघोबा जगदंबे आणि लक्ष्मण शिंदे याच्याविरुद्ध भोकरच्या जिल्हा न्यायालय येथे दोषारोप पत्र सादर झाले होते.

या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे राघोबा जगदंबे आणि लक्ष्मण शिंदे या दोघांना एक वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी हजार रुपये रोख दंड तसेच सहा महिने साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दोन्ही शिक्षा त्यांना एकत्रीत भोगावयाच्या आहेत. त्याचबरोबर दंडाची रक्कम पिडीत कर्मचारी पांडूरंग मोरे यांना अपील कालावधी संपल्यानंतर सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ॲड एस. टी. लाठकर तसेच ॲड. रणजित देशमुख यांनी मांडली. या कामी महावितरणचे कनिष्ठ विधी अधिकारी ॲड इम्रान शेख यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Nanded Msedcl Employee Beating Case Two Arrested Bhokar Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..