नांदेड : मुगट जिल्हा परिषद सर्कलमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Election

नांदेड : मुगट जिल्हा परिषद सर्कलमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार?

बारड : मुगट (ता.मुदखेड) जिल्हा परिषद सर्वसाधारण गटातून नव्या उमेदीचे काँग्रेस पक्षाकडून सरपंच कैलास पाटील पाथरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस कडून ऋषिकेश गोदगे, तर शिवसेनकडून दत्ता पाटील पाथरडकर इच्छुक असल्याने नवीन चेहऱ्याना संधी मिळेल का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

मुगट जिल्हा परिषद गट खुल्या प्रवर्गास सुटल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुदखेड तालुक्यात नवीन जिल्हा परिषद गटाची निर्मिती झाल्याने मुगट जिल्हा परिषद गटात नव्याने अनेक गावांचा समावेश करण्यात आला आहे.

काँग्रेस पक्ष्याकडून सरपंच कैलास पाटील पाथरडकर इच्छुक असून जवळपास नऊ गावातील सरपंच प्रतिनिधींनी त्यांच्या नावास दुजोरा दिल्याने नव्या उमेदीच्या चेहऱ्यांना संधी मिळेल का ? याबाबत तर्कवितर्क चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऋषिकेश गोदगे इच्छुक असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेना पक्षाकडून दत्ता पाटील पाथरडकर इच्छुक असून जिल्हाध्यक्ष आनंदराव बोंढारकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. मुगट जिल्हा परिषद सर्कल मधून नव्या उमेदीच्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे कैलास पाटील पाथरडकर यांची गावपातळीवरील विकास कामे एक जमेची बाजू आहे. सरपंच संघटनेच्या अध्यक्षतेच्या माध्यमातून जनसंपर्क असल्याने गटातील बहुतांशी गावात त्यांच्या वलयाचा ठसा दिसून येतो. हिस्सा पाथरड, धनज, खांबाळा, जवळा फाटक, सरेगाव, बोरगाव नादरी आदी गावातील लोकप्रतिनिधीनी त्यांच्या दावेदारीला दुजोरा दिला आहे.

Web Title: Nanded Mugat Zilla Parishad Election Congress Ncp Shiv Sena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..