

Nanded Mumbai Flight
sakal
नांदेड : मुंबई-नांदेड-मुंबई ही बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘स्टार एअर’ कंपनी ही सेवेसाठी कार्यरत असून, त्यांच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंगही सुरू झाले आहे. त्यामुळे नांदेडसह परिसरातील परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांसाठीदेखील ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.