Nanded News : महापालिका करणार २६ हजार झाडांचे रोपण; नांदेड शहराची ग्रीन सिटीकडे वाटचाल, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
Nanded Municipal Corporation : नांदेड महापालिकेच्या पुढाकाराने शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त २६ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नांदेड : महापालिकेच्या पुढाकाराने शहराला ‘ग्रीन सिटी’ बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेने शहरातील सहा झोनमध्ये एकूण २६ हजार झाडांचे रोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.