
महापालिकेतील स्थायी समितीचे सदस्य श्रीनिवास जाधव, राजेश यन्नम, दयानंद वाघमारे, करुणा कोकाटे, ज्योती कल्याणकर, पूजा पवळे, अब्दुल रशीद अब्दुल गणी, फारुख हुसेन कासिम मिराज आदी आठ सदस्यांची एक डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपल्यामुळे ते निवृत्त झाले आहेत.
नांदेड : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांची उद्या सोमवारी (ता. २१) होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये निवड होणार आहे. काँग्रेस पक्षातील १६ इच्छुक नगरसेवकांनी सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
महापालिकेतील स्थायी समितीचे सदस्य श्रीनिवास जाधव, राजेश यन्नम, दयानंद वाघमारे, करुणा कोकाटे, ज्योती कल्याणकर, पूजा पवळे, अब्दुल रशीद अब्दुल गणी, फारुख हुसेन कासिम मिराज आदी आठ सदस्यांची एक डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपल्यामुळे ते निवृत्त झाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आमदार अमर राजूरकर, माजी आमदार डी. पी. सावंत यांची देखील इच्छुक नगरसेवकांनी भेट घेतली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण गेल्या दोन दिवसापासून नांदेड दौऱ्यावर आहेत. आपली स्थआयी समितीत वर्णी लागावी यासाठी इच्छुक नगरसेवकांनी फिल्डिंग लावून प्रयत्न सुरु केले आहेत.
हेही वाचा - हिंगोलीत स्वच्छ सर्वेक्षणाबाबत फिडबॅक सुरु, नागरिकांना दिल्या पालिकेने टिप्स
सहा वर्षांपूर्वी आनंद चव्हाण यांना पद मिळाले होते ते देखील स्थायी समिती सदस्य आणि सभापतीच्या स्पर्धेत आहेत. तर माजी सभापती किशोर स्वामी हे देखील इच्छुक आहेत त्यांनी मुंबई येथेसुद्धा पालकमंत्र्यांची भेट घेतली. प्रशांत तिडके हेदेखील इच्छुक आहेत. नगरसेविका सुनंदा पाटील, कविता मुळे, ज्योती कदम यादेखील इच्छुक असून त्यांनी देखील आपल्या परीने सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नगरसेविका कौशल्या पुरी यादेखील प्रयत्न करत आहेत. लेबर कॉलनी भागातील नगरसेवक अलीम खान हेदेखील स्पर्धेत असून यांनी नेत्यांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे.
नगरसेविका गीतांजली कापुरे (हटकर), संगीता पाटील, अॅड. महेश कनकदंडे, राजू काळे, महेंद्र पिंपळे, मोहम्मद हाफिस सोहेब हुसेन, रेहाना बेगम चांद कुरेशी आधीचं स्पर्धेमध्ये आहेत.