नगरपंचायतीच्या चार जागांसाठी अर्जांचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Nagar Panchayat seats Application rain for four
नगरपंचायतीच्या चार जागांसाठी अर्जांचा पाऊस

नांदेड : नगरपंचायतीच्या चार जागांसाठी अर्जांचा पाऊस

अर्धापूर : नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) चार जागांसाठी उमेदवारी (Candidate) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल ५८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शहरातील नविआबादी परिसरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये तब्बल ३३ उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात आले आहेत. सत्ताधारी काँग्रेस (Congress) व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने चारही जागांवर पुर्वी घोषित करण्यात आलेल्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना पुन्हा खूल्या प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे. या चार जागांसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांत अपक्ष उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे.‌

हेही वाचा: महादेव जानकार उतरणार लोकसभेच्या रिंगणात; पाहा व्हिडिओ

काँग्रेस पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष राजू शेटे यांच्या पत्नी शालीनी शेटे, छत्रपती कानोडे, माजी नगरसेविका मिनाक्षी राऊत माजी सरपंच सलीम कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गयाबाई भिसे, लक्ष्मी बाई साखरे, अनुराधा माटे, सुवर्णा हाडपकर, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरस्वती सिनगारे, ओमप्रकाश पत्रे, रुक्मिणीबाई नवले, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवसेनेच्या वतीने ओमप्रकाश नागलमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. वंचितच्या सखुबाई सिनगारे यांनी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसींच्या प्रवर्गसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या चार जागा खुल्या प्रवर्गातून निवडून देण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी धावपळ करून सोमवारी (ता.तीन) अर्ज दाखल केले आहेत. उमेवारी दाखल करतांना विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार प्रभागासाठी ५८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यात प्रभाग क्रमांक एकमध्ये दहा, सातमध्ये आठ, नऊमध्ये सात तर सोळामध्ये विक्रमी ३३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: पती, मुलांसमोर भावाने केला सख्या बहिणीचा खून; कौटुंबिक वाद

काँग्रेस ओबीसींच्या पाठीशी : आमदार राजूरकर

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार‌‌‌ जबाबदार आहे. या सरकारने इंपिरिकल डाटा उपलब्ध करून दिला असता तर राजकीय आरक्षण कायम राहिले असते. काँग्रेस पक्ष सदैव ओबीसींच्या पाठीशी राहिला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुर्वी घोषित करण्यात आलेल्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आमचा पक्ष सर्व समाज घटकांना न्याय देणारा असून पुढील काळात सर्व समाज घटकांना न्याय देण्यात येईल अशी माहिती आमदार अमरनाथ राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top