esakal | नांदेड : महसुल विभागाच्या ‘या’ कारवाईवरच संशयाची सुई 
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे आल्या. त्यानंतर या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सयुंक्त कारवाई करण्यात आली.

नांदेड : महसुल विभागाच्या ‘या’ कारवाईवरच संशयाची सुई 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील लॉकडाउनचा फायदा घेत वाळू माफियानी हैदोस घातला आहे. दोन ठिकाणी वाळू माफियांनी हल्ले करून पोलिसांसह सामान्य नागरिकांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वाळू माफियांची मुजोरी वाढत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे आल्या. त्यानंतर या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सयुंक्त कारवाई करण्यात आली. ही कारवाई ब्राम्हणवाडा (ता. नांदेड) येथील गोदावरी पात्रात सोमवारी (ता. २२) केली.
 
जिल्ह्यातील किनवट येथे नुकताच पोलिस पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात एक पोलिस गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी बारा जणांना पोलिसानी अटक केली. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. तर उर्वरीत आरोपी सद्या फरार झाले आहेत पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 हेही वाचा -  प्रीयकराने केला प्रीयसीचा खून...अन् अडकला...

वाळू माफियांचे वाढते हल्ले 
 
तर दुसऱ्या घटनेत ब्रम्हणवाडा (ता. नांदेड) येथील दोन युवकांवर खंजरने प्राणघातक हल्ला झाला होता. वाळू साठ्याची माहिती तहसिलदार यांना का दिली असा संशय घेऊन त्यांच्यावर हल्ला केला होता. यात एकजण गंभीर जखमी असून त्याच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. या दोन्ही घटना घडल्यानंतर महसुल प्रशासनाची झोप उडाली. 

महसुल विभागाची कारवाईच संशयाच्या भवऱ्यात 

मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसिलदार यांचे कान टोचताच त्यांनी कारवाईचा फार्स केला. वाळू उपसा करणारे तराफे जप्त करून जाळले. मात्र त्यांना एकही आरोपी सापडला नाही. यामुळे महसुल विभागाची कारवाईच संशयाच्या भवऱ्यात अडकली आहे. नांदेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे सोमवारी (ता. २२) जून रोजी महसूलच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने गोदावरी नदी पात्रात कारवाई करून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चांगला धडा शिकविला. 

दोन पथकांची कारवाई

जिल्हाधिकारी डॉ. विपिन व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नायब तहसीलदार सारंग चव्हाण व नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांचे दोन वेगवेगळे पथक ब्राह्मणवाडा गाव शिवारात पोहोचले. त्याठिकाणी गोदावरी पात्रातून जवळपास ७९ लहान- मोठे तराफ्याद्वारे अवैध वाळू उपसा होत होता. सदर तराफे जप्त करुन या पथकाने जाळून नष्ट केले. मात्र एकही वाळू उपसा करणारा त्यांच्या तावडीत सापडला नाही. 

येथे क्लिक करा - दिव्यांग सिद्धार्थने रेखाटले ‘या’ अधिकाऱ्याचे रेखाचित्र

७९ तराफे जाळून केले नष्ट 

या अधिकाऱ्यांनी स्वत: बोटीत बसुन नदीतील तराफे कडेला आणले. सारंग चव्हाण यांनी स्वतः घेऊन नदीत उतरले. त्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठीही या कारवाईत सक्रीय झाले होते. वाळू माफियावर यापुढेही दंडात्मक व फौजदारी कारवाई चालू राहील असे सारंग चव्हाण यांनी सांगितले.

loading image
go to top