नांदेड : जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीप पेरण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kharif sowing five lakh hectares

नांदेड : जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीप पेरण्या

नांदेड : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील पेरण्यांची वेग घेतला. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६२ टक्क्यानुसार चार लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारपासून मात्र पावसाचा जोर मंदावला आहे.

जिल्ह्यात खरिप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्राच्या शेवटच्या चरणात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठराविक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी - अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली.

बुधवारपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६२ टक्क्यांनुसार चार लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ३० हजार हेक्टरवर कपाशी, ४४ हजार हेक्टरवर तूर, १५ हजार हेक्टरवर मुग, १४ हजार हेक्टरवर उडीद, दहा हजार हेक्टरवर खरिप ज्वारीची लागवड झाली आहे.

पावसाचा जोर मंदावला

जिल्ह्यात मंगळवारपासून मात्र पावसाचा जोर मंदावला आहे. मागील आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरण्यांना वेग आला होता. बुधवारपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १४०.५० मिलीमीटरनुसार १७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. या काळात शेतकरी अंतरमशागतीची कामे करत आहेत.

Web Title: Nanded No Rain Soybean Kharif Sowing Five Lakh Hectares

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..