
शुक्रवारी ६७४ अहवाल प्राप्त झाले. यातील ६२८ निगेटिव्ह तर ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ३३ इतकी झाली आहे.
नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये रुग्णांची आकडेवारी समोर आली असून शुक्रवारी (ता. १५) प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नव्याने ३४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४. ८४ टक्के असे आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २२ हजार पार गेला आहे.
गुरुवारी (ता.१४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालापैकी शुक्रवारी ६७४ अहवाल प्राप्त झाले. यातील ६२८ निगेटिव्ह तर ३४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजार ३३ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील राजूरा येथील पुरुष (वय ५०) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घरी बरे होण्याचे प्रमाण ९४. ८४ टक्के
शुक्रवारी झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी चार, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, बिलोली - एक, हैद्राबाद येथे संदर्भित एक, हदगाव दोन, मुखेड चार, खासगी रुग्णालय पाच असे एकूण ३४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४. ८४ टक्के आहे. शुक्रवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात २७, नांदेड ग्रामीण एक, कंधार- दोन, माहूर एक, मुखेड एक, परभणी - दोन, बिलोली एक, उमरखेड एक, हिंगोली तीन, असे एकूण ३४ बाधित आढळले.
हेही वाचा- नामांतराचा संघर्ष जिंकला, राजकीय संघर्षाचे काय? ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांचा सवाल
३९५ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु
जिल्ह्यात ३५६ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २६, जिल्हा रुग्णालय १९, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत) ३२, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १४०, मुखेड आठ, हदगाव दोन, महसूल कोविड केअर सेंटर २८, किनवट दोन, देगलूर आठ, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ५६, खाजगी रुग्णालय ३५ आहेत. त्यापैकी १२ रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती.
नांदेड कोरोना मीटर ः
एकूण पॉझिटिव्ह - २२ हजार २३
एकूण बरे - २० हजार ८८७
एकूण मृत्यू - ५७९
शुक्रवारी पॉझिटिव्ह - 34
शुक्रवारी कोरोनामुक्त - ३4
शुक्रवारी मृत्यू - एक
गंभीर रुग्ण -१२
स्वॅब तपासणी सुरु - ३९५
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-३५६