नांदेड : महावितरणच्या कामात अडथळा, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

लक्ष्मीकांत मुळे
Saturday, 24 October 2020

या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती आशी की,  अर्धापूर शहरातील तामसा रस्त्यावरील डीपीचे वायर  जळाल्याने विज पुरवठा गुरुवारी (ता 22) खंडीत झाला होता.

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : विज वितरण कंपनीच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन घटना अर्धापूर व लहान येथे झाल्या आहेत. या प्रकरणातील चार आरोपींना आटक करण्यात आली असून एक फरार झाला आहे. तर एक आरोपी आल्पवयीन आहे. 

या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती आशी की,  अर्धापूर शहरातील तामसा रस्त्यावरील डीपीचे वायर जळाल्याने विज पुरवठा गुरुवारी (ता. 22) खंडीत झाला होता. या प्रकरणी शहरातील ग्राहक विज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले आसता ग्राहक व विद्युत साहाय्यक गंगाधर शिंदे यांच्यात वाद झाला. विद्युत कर्मचारी शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. गंगाधर शिंदे यांनी फिर्याद दिल्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहे.

मारहाण करून शिवीगाळ करित शासकीय कामात अडथळा

लहान येथिल घटनेत रमेश गिरी हे बसस्थानक परिसरातील विद्युत खांब स्थलांतरीत करण्यासाठी गेले आसता तिघांनी आमच्या भुखंडा समोर कांम करू नका म्हणुन मारहाण करून शिवीगाळ करित शासकीय कामात अडथळा निर्माण केला .आशी तक्रार वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश गिरी यांनी दिल्यावरून अर्धापूर पोलीस ठाण्यात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे..या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे हे करित आहेत.तर अर्धापूर येथील घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक साईनाथ सुरवसे हे करित आहेत.

हेही वाचा स्वारातीम विद्यापीठाच्या परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेणार-  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले -

शहरात शासकीय कामात आडथळा निर्माण केल्या घटनेत वाढ

शहरातील विविध कार्यालयात कर्मचारी व अधिकारी मनमानी कारभार करित आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.ज्यांचे वजन आहे तसेच जे कामासाठी चिरीमिरी देतात आशांचीच कामे होतात आशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग उद्भले आहेत. गेल्या काही महिण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्ह्याची संख्या वाढली आहे. यात वितरण कंपनी कार्यालयाशी संबंधित घटना जास्त आहेत. शहरासह तालुक्यातील शासकीय कार्यालयात कामाकाजात सुधारणा होण्याची गरज आहे आशा नागरिकांच्या भावना आहेत.

या दोन्ही घटनेतील चार आरोपींना अर्धापूर पोलीसांनी आटक करून न्यायालयासमोर हजर केले आसता न्यायालयाने  न्यायालयीन कोठडी सुनवली आशी माहिती पोलीस सुत्राने दिली. तर यातील एक आरोपी हा फरार होण्यास यशस्वी झाला असून एक आरोपी अल्पवयीन आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Obstruction in work of MSEDCL, case filed against six persons nanded news