नांदेड : जिल्ह्यात ऑनलाईन मटका जुगार जोमात, ‘सुपरकिंग कॅसीनोद्वारे अवघ्या दोन मिनिटात निकाल

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 November 2020

शहर व जिल्ह्यात मटका जुगार खेळणे नित्याचीच बाब बनली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतरही बाजारपेठ संपुर्णत: बंद असले तरी मटका जुगार मात्र चोरी चुपके सुरुच होता.

नांदेड : शहर व जिल्ह्यात मटका जुगार जोमात सुरु असून यामध्ये आता ऑनलाईन मटक्याने जोर धरला आहे. अवघ्या दोन मिनिटात मटक्याचा निकाल हाती येत असल्याने यामध्ये दररोज जुगाराच्या नावाखाली गंडविले जात असून याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

शहर व जिल्ह्यात मटका जुगार खेळणे नित्याचीच बाब बनली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतरही बाजारपेठ संपुर्णत: बंद असले तरी मटका जुगार मात्र चोरी चुपके सुरुच होता. लॉकडाऊननंतर बाजारपेठ उघडली. तशी मटका जुगाराने जोर धरला आहे. अनेक वेळा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यावर गुन्हे दाखल केले असून अनेकांना हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.परंतू या निर्णयावर मात करत आज घडीला मटका जुगाराचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा नांदेड : राष्ट्रीय महामार्गामुळे किनवट शहराच्या वैभवात भर पडणार -

सद्यस्थितीत ऑनलाईन पध्दतीने सुपरकिंग कसीनो नावाने जुगार खेळल्या जात आहे. यामध्ये जुगाऱ्यांना अवघ्या दोन मिनिटात निकाल प्राप्त होतो. त्यामुळे अनेकांना सुपरकिंग वॅâसीनो जुगार खेळण्याचे वेड लागले आहे. एकंदरीत मटका म्हटले की, चिठ्ठ्याला महत्व प्राप्त होत होते. परंतू ऑनलाईन मटका खेळतांना कोणत्याही प्रकारची काळजी नसावी, असे दिसते, एवंâदरीत या मटक्याला महाराष्ट्रात कुठेही परवानगी नसतांना नांदेड जिल्ह्यात ऑनलाईन मटक्याने मात्र जोर धरला असून याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Online pot gambling is booming in the district, with results from SuperKing Casino in just two minutes nanded news